बेथुजी गुरूजी प्रतिष्ठानकडून व्याख्यानाचे आयोजन

अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
येथील बेथुजी गुरूजी प्रतिष्ठानकडून मान्यवारांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.ए.बी. देशपांडे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डी.जी.धाकडे आणि प्रमुख व्याख्याते म्हणून डॉ.दामोदर थोरात, संतराम कराड, सुरेंद्र नाना खेडगीकर हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी प्रतिष्ठानकडून मान्यवारांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. डॉ.दामोदर थोरात व संतराम कराड यांनी पुण्यतिथीनिमित्त “राष्ट्रपिता महात्मा गांधी” यांच्या विषयीचे आपले मौलिक विचार व्यक्त केले. या प्रसंगी पांडुरंग चव्हाण, अभियंता दत्तात्रय गावरस्कर, सुंदर मारवाळ, अभियंता शरद देशपांडे, भागवत कांबळे, आयोजक प्रा.राम चौधरी धर्मापुरीकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळेस आदर्श पालक म्हणून यापूर्वी अंबाजोगाई दूरदर्शन केंद्रात काम करणारे कर्मचारी मुरलीधर चव्हाण आणि कामगार कल्याण केंद्राचे संचालक शिवाजीराव हुलगुंडे यांचा सेवागौरव सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजक प्रा.राम चौधरी धर्मापुरीकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाची सुरुवात श्रीधर काळेगावकर, मधुकर बाभुळगावकर आणि भारत वेडे यांनी गायलेल्या स्वागतगीताने करण्यात आली. तर अध्यक्षीय समारोप डॉ.ए.बी.देशपांडे यांनी केला. उपस्थित सर्वांचे आभार सुरेंद्रनाना खेडगीकर यांनी मानले.