भाजपाने अदानीच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय जनतेला लुटून भुकेकंगाल केले – राजेसाहेब देशमुख
भारज येथे काँग्रेसच्या "हाथ से हाथ जोडो" अभियानास जनतेचा उस्फुर्त प्रतिसाद

अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
आज भाजपच्या चुकीच्या धोरणामुळे मोडून पडलेली ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था काँग्रेस पक्षच सुधारू शकतो, सामान्य माणसाला आर्थिक ताकद देण्याचे काम हे काँग्रेस पक्षच करू शकतो, अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात काँग्रेस नेत्या खासदार सौ.रजनीताई पाटील यांचे केलेले निलंबन हे चुकीचे असून, ही मुस्कटदाबी काँग्रेस पक्ष कदापिही सहन करणार नाही, आम्ही काँग्रेस नेत्या खासदार सौ.पाटील यांच्या निलंबनाचा जाहीर निषेध करीत आहोत, हा देश काय आदानीला विकलाय का..? असा सवाल करून अदानी व भाजपाचे पंतप्रधान मोदी यांचे काय नाते आहे, हे केंद्र सरकारने जाहीर करावे. कारण, जो अदानी मागील आठ वर्षापूर्वी देशातील उद्योगपतींच्या यादीत तब्बल 609 व्या क्रमांकावर होता, तो अचानक भाजपच्या सत्तेच्या काळात श्रीमंत उद्योगपतीच्या यादीत दोन क्रमांकावर कसा काय आला याचे उत्तर भाजपा व पंतप्रधान मोदी यांनी भारतीय जनतेला द्यावे, आदानीकडे अचानक एवढे पैसे कुठून आले..? शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारून आदानीला मोठे करण्याचे व सामान्य भारतीय जनतेला भुकेकंगाल करण्याचे काम भाजपाने मागील आठ वर्षात केले आहे, देशाच्या प्रगतीसाठी व सर्वसामान्य माणसाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आजही काँग्रेस पक्ष हाच भारतीय जनतेसमोर सक्षम पर्याय आहे. सर्वसामान्य, माध्यमवर्गीय आणि गोरगरीब माणसांनी बचत केलेल्या पैशातून एलआयसी मध्ये विमा रकमेपोटी जमा केलेल्या पैशावर अदानीचा व भाजपचे पंतप्रधान मोदी यांचा डोळा आहे. एलआयसीच्या पैशांची ही लूट करण्याचे अदानी व भाजपचे पंतप्रधान मोदी यांचे प्रयत्न सुरू असून यामुळे सर्वसामान्य जनतेचा भाजपावरील विश्वास आता उडत चालला आहे, त्यामुळे मोदी, भाजपा व अदानीने भारत देशाची लूट थांबवावी अन्यथा भारतीय जनता हे कदापिही सहन करणार नाही, देशाची लूट करणाऱ्या भाजपाला हद्दपार करण्यासाठी भारतीय जनतेने काँग्रेस पक्षाच्या मागे आपली ताकद उभी करावी असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी केले.
आमच्या प्रतिनिधीशी बोलताना बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख म्हणाले की, देशाचे नेते खासदार राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने देशभरात “भारत जोडो यात्रा” काढली आहे. मात्र, काँग्रेस पक्ष इथेच थांबला नसून भारत जोडो यात्रे दरम्यानच पक्षाने संपूर्ण देशभरात ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान सुरू केले आहे. हे अभियान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील, प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले, खासदार सौ.रजनीताई पाटील, माजी मंत्री अशोकराव पाटील यांच्या नेतृत्वात प्रभाविपणे राबविण्यात येत आहे. बीड जिल्ह्यात हे अभियान 26 जानेवारीपासून सुरू करण्यात आले असल्याची माहिती बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष देशमुख यांनी दिली आहे. तर यावेळी बोलताना काँग्रेसचे युवा नेते आदित्यदादा पाटील हे म्हणाले की, 26 जानेवारीपासून काँग्रेस पक्षाचे “हाथ से हाथ जोडो” हे अभियान सुरू झाले असून आहे. या अभियानांतर्गत काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन लोकांशी संवाद साधून भारत जोडो यात्रेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. या सोबतच काँग्रेस पक्षाने भाजपाच्या नरेंद्र मोदी सरकार विरोधात आरोपपत्र ही तयार केले असून ते ही भारतीय जनतेपर्यंत
पोहचवले जात आहे. तसेच राज्यांच्या प्रदेश काँग्रेस समित्या ही आपापल्या राज्य सरकारांविरूद्ध आरोपपत्र तयार करणार आहेत. अशी माहिती पाटील यांनी दिली. याप्रसंगी बीड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल सोनवणे यांनी सांगितले की, “हाथ से हाथ जोडो” अभियानांतर्गत काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी ते लोकांपर्यंत आपापल्या मतदारसंघातील मतदारांच्या घरी जाऊन त्यांना काँग्रेसची विचारधारा सांगणार आहेत. “भारत जोडो” यात्रेत दिलेला संदेश घराघरात पोहोचवला जाईल या दरम्यान देशाचे नेते राहुलजी गांधी यांचे एक पत्र देखील जनतेला दिले जाणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या कामकाज, निर्णय व धोरणातील असंख्य त्रुटी, उणीवा सांगणारे आरोपपत्र ही वितरित करण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत 26 जानेवारी ते 26 मार्च 2023 या कालावधीत देशातील 2.5 लाख ग्रामपंचायती आणि 6 लाख गावांपर्यंत पोहोचण्याचे काँग्रेस पक्षाचे उद्दिष्ट आहे. अशी माहिती बीड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष सोनवणे यांनी दिली आहे. अंबाजोगाई तालुक्याचे अध्यक्ष ईश्वर शिंदे यांच्या भारज या गावात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवनिर्वाचित उपसरपंच विलासराव देशमुख हे होते, तर यावेळेस व्यासपीठावर बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख, युवक नेते आदित्यदादा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राहुल सोनवणे, अंबाजोगाई काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ईश्वर शिंदे, परळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा.अनिल जाधव, शहराध्यक्ष बहादूरभाई, परळी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष रणजित देशमुख, पशुपतीनाथ दांगट, ज्येष्ठ नेते प्रवीणकुमार शेप, हालगे आप्पा हे मान्यवर उपस्थित होते. यावेळेस अंबाजोगाई काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ईश्वर शिंदे, परळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा.अनिल जाधव, शहराध्यक्ष बहादूरभाई, परळी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष रणजित देशमुख यांची समायोचित भाषणे झाली. अध्यक्षीय समारोप नवनिर्वाचित उपसरपंच विलासराव देशमुख यांनी केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक अंबाजोगाई काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ईश्वर शिंदे यांनी केले तर उपस्थितांचे आभार आबासाहेब शिंदे यांनी मानले. या कार्यक्रमास अर्जुन लगसकर, रवींद्र देशमुख, बालासाहेब शिंदे, बालाजी मोरे, अविनाश शाहीर, शेख मुक्तार, सिद्राम जाधव, दयानंद मेटे, गणेश देशमुख, रघुराज शिंदे, योगेश गोरे, संतोष शिंदे, बाबुराव पवार, दत्तात्रय शिंदे यांच्यासह भारज ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सदस्य, जेष्ठ नागरिक, काँग्रेस पक्षाच्या विविध विभागाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.