पूनमचंद परदेशी यांचा विधायक पुढाकार ; सामाजिक भान राखत वृद्ध, निराधार आणि गरजूना मिठाई वाटप करून वाढदिवस साजरा
वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष

अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
आपला वाढदिवस मौजमजेत साजरा करण्याऐवजी समाजभान जोपासत आपल्या आनंदात समाजातील वृद्ध, निराधार आणि गरजूना सहभागी करून घेत मिठाई वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवत येथील पत्रकार पूनमचंद सीताराम परदेशी यांनी आपला वाढदिवस साजरा केला.
यावेळेस त्यांनी यापुढील काळात ही असेच समाजहिताचे उपक्रम राबविणार असल्याचा संकल्प बोलून दाखवला. यापूर्वी ही परदेशी यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून वृक्षारोपण तसेच विद्यार्थ्यांना खाऊ आणि शालेय वस्तूंचे वाटप, गरजूना मदत केलेली आहे. पूनमचंद परदेशी हे मागील दोन वर्षांपूर्वी येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या प्राथमिक शाळेतून एक विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. सध्या ते “दैनिक परळी प्रहार” या वर्तमानपत्राचे तसेच “न्यूज टुडे 24” या न्यूज चॅनेलचे अंबाजोगाई प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. अत्यन्त मनमिळाऊ व परोपकारी वृतीच्या परदेशी यांचा सामाजिक व धार्मिक उपक्रमात हिरीरीने सहभाग असतो हे विशेष होय. परदेशी यांनी वाढदिवसानिमित्त स्वतः अनावश्यक खर्च टाळून नातेवाईक आणि मित्रांना सोबत घेऊन समाजभान जोपासत आपल्या आनंदात समाजातील वृद्ध, निराधार आणि गरजूना सहभागी करून घेत मिठाई वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवत येथील पत्रकार पूनमचंद सीताराम परदेशी यांनी आपला वाढदिवस साजरा केला. हल्ली समाजात एकीकडे शक्तीप्रदर्शन करून, आपला वाढदिवस साजरा करण्याचे प्रकार अनेक ठिकाणी पहायला मिळतात. मात्र पत्रकार परदेशी यांनी या परंपरेला फाटा देत आपला वाढदिवस लोकहिताचे उपक्रम आणि नागरिकांना मदत करून साजरा करण्याचा मानस व्यक्त केला होता तो त्यांनी पुर्ण केला. त्यानुसार नियोजन करून अंबाजोगाई शहरातील लोकनेते यशवंतराव चव्हाण चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्वातंत्र्यावीर सावरकर चौक, बस स्थानक परिसर, नगरपरिषद परिसरातील वृद्ध, निराधार आणि गरजूना खिचडी आणि मिठाई वाटप केली, याकामी त्यांना पत्रकार व्यंकटेश जोशी आणि पत्रकार फेरोझभाई यांचे सहकार्य लाभले. याबाबत अधिक माहिती देताना पत्रकार परदेशी म्हणाले की, वाढदिवस हा दरवर्षी येणार आहे. मात्र त्यानिमित्ताने सामाजिक बांधिलकी जोपासणे गरजेचे आहे. सभोवतालच्या परिस्थितीची जाणीव ठेऊन विधायक उपक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. वाढदिवसानिमित्त परदेशी यांचे राजकीय, सामाजिक, पत्रकारिता, शिक्षण क्षेत्रासह नातेवाईक आणि मित्रपरिवार यांनी हार्दिक अभिष्टचिंतन करून शुभेच्छांचा वर्षाव केला.