जिजाऊ हिरकणी पत्रकारिता पुरस्काराने गोविंद शिनगारे यांचा सहकारमहर्षी मा. दिलीपरावजी देशमुख यांच्या शुभहस्ते सन्मान
सहयाद्री मराठी पत्रकार संघाच्या शिरपेचात मानाचा तुरा.

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष
वैभवशाली /प्रतिनिधी
लातूर येथे मागील सात वर्षपासून विकास दर्पण व प्रवीण शिक्षण प्रसारक मंडळ लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्य आयोजक श्री भगवनरावजी पाटील व मुख्य संपादिका शिवमती वैशालीताई पाटील यांच्या वतीने समजातील विशेष कार्य करणाऱ्या महिला,पुरुष यांना राज्यस्तरीय जिजाऊ हिरकणी पुरस्काराने सन्मानित करण्यात येते .याच प्रमाणे याही वर्षी सहकार महर्षी मा.दिलीपरावजी देशमुख व विठ्ठल रुकमाई मंदिर पंढरपूरचे सहअध्यक्ष ह .भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या शुभ हस्ते लातूर येथील भव्यदिव्य कार्यक्रमात केज येथील सह्याद्री पत्रकार संघाचे संघटक आणि आणि संघाचे आधारस्तंभ पत्रकार श्री गोविंद शिनगारे यांना
जिजाऊ हिरकणी पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्थंभ मानला जातो .गोविंद शिनगारे सतत समाजासाठी स्वतःला वाहून देऊन समाजकार्य तसेच शैक्षणिक कार्य, व समाजात असणाऱ्या विविध समस्याना पत्रकारितेतुन आपल्या लेखणीच्या माध्यमातून सतत सत्याची बाजू मांडून सडेतोड विचार व्यक्त करण्याची धमक गोविंद शिनगारे करत असतात .त्यांच्या कार्याची दखल घेत जिजाऊ हिरकणी पुरस्काराने लातुर येथे सन्मानित करण्यात आले .
सत्य परेशान हो सकता है,पराजित नहीं….
पत्रकारिता क्षेत्रात काम करत असताना सत्य समाजासमोर आणून देण्याचे महान कार्य पत्रकार करत असतो.परंतु सत्य परिस्थितीवर कार्य करत असताना बऱ्याच गोष्टीला सामोरे जावे लागते हे ही तितकेच खरे आहे.आज समाजात सत्याची बाजू मांडणारे व निर्भीड पत्रकाराना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो परंतु कोणाची व कश्याचीही तमा न बाळगता , कोणी काही म्हटले कोणी कीतीही त्रास दिला तरी सत्याची बाजू आपल्या लेखणीतून मांडणारे गोविंद शिनगारे यांच्या कामाची पावती म्हणून जिजाऊ हिरकणी पुरस्काराने सन्मानित करून सत्य परेशान हो सकता है ,पराजित नहीं .असे दाखवून दिले असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सहकारमहर्षी मा. दिलीपरावजी देशमुख , विठ्ठल रखुमाई मंदिरचे सह अध्यक्ष औसेकर महाराज नारायण पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभहस्ते सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार धीरजभैय्या विलासराव देशमुख ,
आबासाहेब पाटील देशमुख,(सहकार बोर्ड महाराष्ट्र राज्य,)अशोकरावजी पाटील निलंगेकर,(सेक्रेटरी ,प्रदेश काँग्रेस कमिटी महाराष्ट्र् राज्य) यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभहस्ते हा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला.