ग्रामशक्ती वेल्फेअर फाउंडेशन अंबाजोगाई यांच्यावतीने मोफत सायकलींचे वाटप करण्यात येणार

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष
अंबाजोगाई प्रतिनिधी/ प्रा.दत्ता जाधव
अंबाजोगाई येथे एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील बीड,धाराशिव, लातूर जिल्ह्यातील भूमिहीन, शेतमजूर, घरेलू कामगार, विधवा, परित्यक्ता, ऊसतोड मजूर, एकल पालक व मूकबधिर,गरजवंत गोरगरीब विद्यार्थिनींना, आरोग्य क्षेत्रातील आशाताई,ग्रामशक्ती वेल्फेअर फाउंडेशन अंबाजोगाई च्या वतीने रविवार 23 जुलै रोजी दुपारी एक वाजता स्वयंवर मंगल कार्यालय अंबाजोगाई येथे सायकलींचे वाटप करण्यात येणार आहे. सदरील कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नवी दिल्ली चे डॉ. महेश नायकुडे साहेब, शरद झाडके साहेब उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई, प्रशांत बर्दापूरकर दैनिक सकाळ तालुका प्रतिनिधी, प्राचार्य जगदीश गवळी (साई संगणक शास्त्र महाविद्यालय रांजणी), भागवत मसने (सहशिक्षक योगेश्वरी नूतन विद्यालय अंबाजोगाई), संपत सारडा (वरद हाइट्स अंबाजोगाई), सुनील मस्के उपसरपंच ग्रामपंचायत जोगाईवाडी,बळीराम चोपणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सदरील उपक्रमासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन ग्रामशक्ती वेल्फेअर फाउंडेशन चे अध्यक्ष ज्योतीराम सोनके यांनी केली आहे.