आपला जिल्हावैभवशाली महाराष्ट्र न्युजसामाजिक
जिवाची वाडी -केज एस.टी.बस वेळेत बदल करा-सचीन भुतडा

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष
येवता: केज तालुक्यातील जीवाची वाडी-केज एस.टी.बस सेवा चालू आहे,परंतू काही महिन्यांन पासुन एस.टी.वेळेत बद्धल केल्याने प्रवाशांचे हाल होत असून अडचणीस सामोरे जावे लागत असलेने युवा नेते, सचीन ओमप्रकाश भुतडा,सचिव,माहेश्वरी सभा,केज तालुका यांनी धारूर आगार कार्यालयात जाऊन निवेदन देऊन
एस.टी.बसचा वेळ संध्याकाळीची गाडी वेळे-६:१५,सकाळची -०७:००वा.आणि परत सकाळची वेळ -०९:१५ पूर्वी प्रमाणेच करण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन देऊन केज -जीवाची वाडी-वडवणी हि पण एस.टी.बस सुरू करण्याची भुतडा यांनी समक्ष चर्चा करून मागणी केली आहे.
चौकट
आमच्या प्रतिनिधीने फोन वरून धारूर आगार प्रमुख,भरत कोमटवार यांना संपर्क केला असता ते म्हणाले की हा विषय प्राधान्याने सोडऊन बससेवा सुरळीत केली जाईल.