ग्राम शक्ती वेल्फेअर फाउंडेशन चे कार्य कौतुकास्पद: बीड जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस राहुल सोनवणे

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष
केज (प्रतिनिधी) ग्राम शक्ती वेल्फेअर फाउंडेशन अंबाजोगाई व सेवा सहयोग फाउंडेशन, पुणे यांच्यामार्फत पुरुषोत्तम दादा सोनवणे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सारणी (आ) तालुका केज जिल्हा बीड या प्रशालेस पाच संगणक भेट देण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय काँग्रेसचे बीड जिल्हा उपाध्यक्ष राहुल भैया सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी बोलताना सांगितली की ग्राम शक्ती वेल्फेअर फाउंडेशन अंबाजोगाई चे कार्य शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहे. व कौतुकास्पद आहे. यावेळी ग्राम शक्ती वेल्फेअर फाउंडेशन चे अध्यक्ष ज्योतीराम सोनके यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व फेटा बांधून सत्कार करण्यात आला. व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. ग्रामशक्ती वेल्फेअर फाउंडेशन अंबाजोगाई संस्थेच्या वतीने अनेक शाळांमध्ये संगणक वितरणाचे काम सुरू आहे. भावी पिढीला संगणकीय ज्ञान महत्त्वाचे आहे. संगणक शिक्षण काळाची गरज आहे हे ओळखून ग्रामीण भागामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये व सामाजिक क्षेत्रामध्ये संस्था कार्यरत आहे. अंबाजोगाई येथे वृद्धाश्रम निर्मितीचेही काम संस्थेअंतर्गत सुरू आहे.
तसेच मुंबई व पुणे येथील विविध संस्थेच्या वतीने बीड , धाराशिव, लातूर जिल्ह्यातील गरीब व होतकरू, शेतमजूर, भूमिहीन, शेतकरी,परित्यक्ता, शेतकरी, मजूर, ऊसतोड मजूर,यांच्या पाल्यांसाठी, विद्यार्थ्यांना यावर्षी अडीच लाखापर्यंत शिष्यवृत्ती ही मंजूर करण्यात आली आहे.असे ग्रामशक्ती वेल्फेअर फाउंडेशन च्या वतीने सांगण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक लोमटे पि.एच., आरोग्य केंद्र युसुफवडगाव चे डॉ. सूर्यवंशी कृष्णा, आरोग्य सहाय्यक थोरात आर आर, ग्रामशक्ती फाउंडेशनचे उपाध्यक्ष प्रा.भागवत गोरे, रमेश कुलकर्णी, ग्राम शक्ती वेल्फेअर फाउंडेशनचे मार्गदर्शक शशिकांत वेदपाठक, केज पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष सोनवणे,थोरात ए जी, सावंत एम.एल, पाटील एल आर, गांगुर्डे सर,याच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.