सैनिकी स्कूल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचा ग्रामशक्ती वेल्फेअर फाउंडेशन च्या वतीने सत्कार
गुणवंत विद्यार्थी विशेष सन्मान

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज मिडिया
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
ऑल इंडिया सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षा सन 2023 उत्तीर्ण होऊन डॉ. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सैनिकी स्कूल लोणी प्रवरानगर येथे प्रवेश मिळाल्याबद्दल आयुष अमोल काकडे व रुद्रप्रताप भागवत जाधव या विद्यार्थ्यांचा सत्कार ग्रामशक्ती वेल्फेअर फाउंडेशन अंबाजोगाई च्या वतीने नुकताच करण्यात आला. आयुष काकडे यांने जूनियर आयएएस परीक्षेमध्ये राज्यातून तृतीय क्रमांक येण्याचा मानही मिळवला आहे. तसेच सदरील विद्यार्थी स्कॉलरशिप पात्र झाले आहेत. यावेळी मराठवाडा शिक्षक संघाचे धाराशिव जिल्हा सचिव मयाचारी व्ही.एस, ग्रामशक्ती वेल्फेअर फाउंडेशन अंबाजोगाईचे अध्यक्ष ज्योतीराम सोनके, उपाध्यक्ष प्रा.भागवत गोरे, होळेश्वर विद्यालय होळचे सहशिक्षक बालासाहेब खोगरे, इलाईट कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा.अशोक नखाते, नितीन गोबाले, अमोल काकडे, भागवत जाधव आदींसह पालक उपस्थित होते.