महाडीबीटी पोर्टल खरीप हंगाम 2023 बियाणे अनुदान करिता अर्ज सुरू
प्रमाणित बियाणे, प्रात्यक्षिक बियाणे अर्ज करा तालुका कृषी कार्यालयाचे आवाहन

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज मिडिया
कृषी विशेष वार्ता
केज तालुका प्रतिनिधी
खरीप हंगाम 2023 करिता *कृषि विभाग* मार्फत नियोजन झालेले असून आता महाडीबीटी पोर्टल वर *बियाणे घटकासाठी* अर्ज सुरू करण्यात आले आहेत.
बियाणे घटक मध्ये कृषि विभाग मार्फत *प्रमाणित बियाणे* वितरण आणि पीक *प्रात्यक्षिक बियाणे* या दोन घटकासाठी अर्ज स्वीकारले जातात. यामध्ये *प्रमाणित* बियाण्या मध्ये निवड झाल्यानंतर शेतकर्याला *50% अनुदानावरती* बियाणे दिले जाते आणि *पीक प्रात्यक्षिक* मध्ये निवड झाल्यानंतर त्या शेतकर्यांना त्या पिकाचे नवीन वाण हे मोफत दिले जाते.
ऑनलाइन अर्ज सुरुवात : *13 मे 2023*
*अर्ज करण्याची अंतिम मुदत : 25 मे 2023 (बदल होऊ शकतो)*
*पीक : सोयाबीन, मूग, तूर, उडीद, मका इ.*
*अनुदान : प्रमाणित बियाणे 50% प्रात्यक्षिक बियाणे 100%*
*अर्ज करण्याचे संकेतस्थळ महाडीबीटी फार्मर पोर्टल
*https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*तालुका कृषि विभाग आणि कृषि सहायक तालुका कृषि कार्यालय.*