शाहीर मधुकर कदम महाकवी वामनदादा कर्डक वादळवारा पुरस्काराने सन्मानित

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष
विशेष सन्मान सोहळा
केज तालुका प्रतिनिधी
केज तालुक्यातील पैठण येथील रहिवाशी विद्रोही शाहीर मधुकर कदम यांना मराठी साहीत्य वार्ता व महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महोत्सव समिती बीड यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी साहीत्य सम्मेलन बीड येथे महाकवी वामनदादा कर्डक वादळवारा
पुरस्काराने विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
सम्मेलनाध्यक्ष प्रा. डाॅ.वाल्मिक सरवदे तथा( अखील
भारतीय वाणीज्य परिषदेचे अध्यक्ष), आंबेडकरी साहीत्यीक व अभ्यासक मा. ज.वि पवार ,संयोजक अमरदिप वानखेडे,शेखर मगर यांच्या हस्ते
“महाकवी वामनदादा कर्डक वादळवारा “पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.त्यांचे लोकचळवळीतील फुले शाहू आंबेडकरी विचारधारा ,प्रबोधन ,जाणीव जागृती योगदान अतुलनीय आहे. ग्रामीण भागातील प्रबोधनात्मक उत्कृष्ट कार्य याबद्दल त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे