जागर रयतेचा लढा मातीचा शेकापच्या संपर्क अभियानाला सुरुवात जिल्ह्यात वर्षभर संपर्क आभियान -भाई मोहन गुंड

प्रतिनिधी वडवणी
शेतकरी कामगार पक्ष बीडच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यासाठी जिल्हाभर गाव न गाव शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, युवक,महिला यांच्यामध्ये जागृती निर्माण करून व्यवस्थेचा बळी ठरलेला शेतकरी लढायला उभा करणे या अभियानाचा प्रयत्न असून हे अभियान वर्षभर चालणार वर्षभरात जिल्ह्यात एक गाव एक सभा घेण्याचा संकल्प या अभियानात केलेला आहे, या अभियानाच्या द्वारे शेतकरी कामगार पक्षाचे नेते,कार्यकर्ते, पदाधिकारी एकूण 500 सभा घेणार असून या अभियानाची सांगता 17 सप्टेंबर 2023 रोजी भव्य शेतकरी मेळावा घेऊन करण्यात येणार आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक विचाराने प्रेरित होऊन निर्माण झालेल्या शेतकरी कामगार पक्षाचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान,मराठवाडा मुक्ती संग्रामातील योगदान, कापूस एक अधिकार योजना, रोजगार हमी योजना यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे योगदान, शेतकरी कामगार पक्ष काल आज आणि उद्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पक्षाची रस्त्यावरील लढाई, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकरी कामगार पक्षाची भूमिका आणि तिचे महत्त्व या विषयावर जनतेमध्ये जागृती निर्माण करून आज निर्माण झालेल्या शेतकऱ्यांच्या विदारक परिस्थितीवर शेतकरी एकजूट निर्माण करून शेतीवर आलेले आसमानी आणि सुलतानी संकट परतून लावण्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांना लढ्यामध्ये सहभागी करून घेण्यासाठी या अभियानाचा प्रयत्न असेल
जागर रयतेचा!
लढा मातीचा!
विचार स्वराज्याचा!!
छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतील स्वराज्य निर्माण करण्यासाठी बांधावरला शेतकरी या लढ्यात उतरला पाहिजे यासाठी देखील प्रयत्न असणार आहे, या अभियानाची सुरुवात आज 17सप्टेंबर 2022 रोजी आज सकाळी वडवणी तालुक्यातील देवळा या गावी जागर सभा घेऊन करण्यात आली. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील माजी पंचायत समिती सदस्य, हे होते तर प्रमुख पाहुणे शेकापचे ज्येष्ठ नेते भाई बाबुराव जाधव, शेकापचे युवा नेते भाई मोहन गुंड, भाई अॅड. नारायण गोले पाटील, भाई गणपत कोळपे भाई अशोक रोडे,अॅड निखिल बचुटे भाई मुंजा पांचाळ भरत किनोळकर उपस्थित होते, या वेळी सेवानिवृत्त मंडळाधिकारी पद्माकर मुळाटे यांनी शेकाप मध्ये प्रवेश केला .
बीड जिल्हयात शेतकरी कष्टकरी, कामगार यांची
दिवसे-दिवस आर्थिक परिस्थिती खालावत चालली आहे, शिक्षणाचे बाजारीकरण, वाढती बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, शेतीमालाची कवडीमोल किमतीत शासनाकडून होत असलेली खरेदी व राजकिय उदासीनता या प्रश्नाने जनता त्रस्त झाली आहे. दिवसेंदिवस शेतकऱ्याच्या वाढत चाललेल्या आत्महत्येचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, या प्रश्नाला वाचा फोडायची आसेल तर एकजूटीने व्यवस्थेविरुद्ध लढल्या शिवाय पर्याय नाही या साठी जनजागृती व्हावी म्हणून संपर्क अभियान बीड जिल्ह्यात राबवत असल्याचे भाई मोहन गुंड यांनी व्यक्त केले.
या वेळी भाई बाबुराव जाधव यांनी मराठवाडा स्वातंत्र्य संग्रामातील लढ्यात शेतकरी कामगार पक्षाचे नेते अग्रभागी असल्याचे मत व्यक्त केले,या व्यवस्थेत शेतकरी भर दुपारी लुटला जातो आहे.असे असताना शेतकऱ्यांच्या मुलांनाच आता ही लढाई पुढं घेऊन जावी लागेल अन्यथा येणार काळ शेतकऱ्यांसाठी भयंकर असेल या मुळे आपण आपल्या बापाच्या सांडलेल्या रक्ताचा आणि घामाचा हिशोब मागण्यासाठी लढायला तयार व्हा.. असे मत भाई अॅड.नारायण गोले पाटील यांनी व्यक्त केले, कार्यक्रमाचे आयोजक भाई अनिल कदम यांनी अभियानातून गावकऱ्यांना जागृतीचा मंत्र दिल्याबद्दल आभार व्यक्त केले,या कार्यक्रमाला सरपंच डॉ सुरेश शिंदे, ओमप्राकाश शिंदे बाळासाहेब शिंदे बी टी डोंगरे पढरुनाथ निकम आसाराम बापू खडुळ, विष्णू शेळके यासह गावातील प्रतिष्ठित नागरीक, शेतकरी, कामगार,युवक यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.