आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनसामाजिक

महा मॅरेथॉन स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा – सुनील कावळे

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज मिडीया

क्रिडा विश्व विशेष

 

धारूर/ प्रतिनिधी

 

किल्ले धारूर शहरात 15 ऑगस्ट रोजी किल्ले धारूर मोरया प्रतिष्ठान यांच्या वतीने घेण्यात येत असलेल्या महा मॅरेथॉन स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन मोरया प्रतिष्ठान चे अध्यक्ष सुनिल कावळे यांनी केले आहे

 

किल्ले धारूर शहरात स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून 15 ऑगस्ट रोजी किल्ले धारुर मोरया प्रतिष्ठान च्या वतीने महा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले जाते यंदाचे हे 5 वे वर्ष असून या होत असलेल्या स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर रोख बक्षीसा सह पारितोषिक देण्यात येणार आहे या स्पर्धेत प्रथम पारितोषिक 7001, द्वितीय 6001 ,तृतीय 5001, चौथे 4001 व पाचवे 3001 असे बक्षीस दिले जाणार असून पाच उत्तेजनार्थ खेळाडूंना बक्षिसे दिली जाणार आहेत या स्पर्धेचे अंतर 5 किलोमीटर असणार आहे या स्पर्धेची सुरुवात शहीद रमेश पवार स्मारक घाटपाटी तेलगाव रोड येथून सकाळी ठीक 10 वा स्पर्धेला सुरुवात करण्यात येणार आहे करण्यात त्यामुळे या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवण्यासाठी सुनील कावळे 9970208444, निखिल फाटे 8149900807, दत्ता बनसोडे 9096961056, आशिष भोसले 8605782222, आदिल कुरेशी 9975087050, जिजाभाऊ शेळके 8830959349, मुकीद जरगर 9595571040, ऋतिक सावंत 8669785590, ज्ञानेश्वर तट 9890793138, आकाश गैबी 7387623022, विशाल सराफ 8553535362, महेश गवळी 9860661996, महेश खवतोडकर 9860661996, अमोल सिरसाट 9730065590, विनयजित शिंदे 9209350158 यांच्याशी संपर्क करून आपण स्पर्धकांनी स्पर्धे संदर्भात अधिक माहिती घ्यावी स्पर्धेत सहभाग नोंदवण्यासाठी 150 रुपये सहभाग फिस ठेवण्यात आलेली आहे व खेळाडूंना आयोजकाकडून टी-शर्ट देण्यात येणार आहे याची खेळाडूंनी नोंद घेऊन जास्तीत जास्त खेळाडूंनी महा मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन मोरया प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील कावळे यांनी केले आहे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.