ताज्या घडामोडी

आठवणीतले माझे साहेब

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज मिडिया

खरच काय निसर्गाची किमया असते, फुलपाखरु क्षणभर बोटावरती बसत आणि चटकन बोटाला रंग चिकटुन जाते. ते रंगही असे असतात कोणत्याच कारागीराला ते रंग बनवता येत नाहीत. अंगोळीचा साबण सटकन हातातुन निसटावा तसे दिवस निघुन जातात, खरचं साहेब तुम्ही विमानात बसुन वैकुंठाला गेलेले एक साल झालं कसं मनाला पटणार आहे का हे, अहो, प्रत्येक जागेवर, प्रत्येक ह्दयावर तुम्हच्या पायाचा ठसा जशास तसाच आहे ना, साहेब तुम्हच्या आठवणी ईवलाशा रोपट्याप्रमाणे थोड्याच आहेत, त्या लिहायच्या म्हणलं तर मशकाने आकाश कवेत घेतल्याप्रमाणे होईल, तुम आठवणी तर अंथाग सागरासारख्या आहेत कारण तुम्ही अद्वितीय नेते होतात. अहो नेता कसले घरातील सदस्य होतात ईतके मोठे होतात तर मग पाठीवरती शाबासकीची थाप कशी टाकयचात, काहितरी छोट्या मोठ्या संकटात जवळ घेऊन डोकं ठेवायला हक्काचा खांदा कसा द्यायचात, अहो तुम्ही जर आम्हच्या वयाईतके आयुष्य विधानभवनात घालवलेले ईतके मोठे नेते होतात, तर दशा तुटलेल्या घोंगडीवर बसुन आईच्या हाताची करपटलेली भाकरी ईतक्या आवडीने कशी काय खायचात तुम्ही नेते होतात मग ईत्तर नेत्यासारखे तुम्ही रुबाब का दाखवला नाही, घरातील सदस्याप्रमाणेच ईतक्या जवळीकतेने कसं राहिलात, सहवास तसा आपला खुप क्षणभंगुर तरीही जवळीकता रक्ताच्या नात्याहुनही जास्त, साक्षी ताईंना तुम्ही मुलगी आणि भारतला मुलगा म्हणुन मान्यता दिली च्यानंतरच आपला संपर्क परंतु खुप हाडाचा कार्यकर्ता असल्यासारखं ईतकी जवळीकता वाढली की, कधी न संपावा असा सहवास निर्माण झाला.साहेब खरचं आम्ही ईतकं कमनशिबी असावं ईतकं, दुर्भांगीत असावं, जस की, ज्या वडिलांनी हाता, खांद्यावर लेकराला खेळवावं त्याला चालायला शिकवावं आणि अचानक वडिलांनी चालता चालता बोट सोडुन माणसांच्या गर्दीतुन निघुन जावं तसाच काहिसा प्रकार साहेब,अहो कोणत्याही कार्यांलयात गेल्यानंतर थोडा विलंब लागला की सर्वोंच्च अधिकार्यांला फोन करुन सांगा, म्हणायच आणि तितक्याच तात्काळ तुम्ही कॉल करुन सांगायचं अहो कसं जमलं तुम्हाला हे सर्वं. आणि ईतकं सर्वं जमलेलं कोणालाच नाही शिकवलं तुम्ही. ही सर्वांत मोठी शेकांतिका आहे,तुम्ही राजकारण हे बोटावर मोजण्याईतकंच केलं मात्र समाजकारण हे, असंख्य समाजोपयोगी कार्यांनी केलं, आदर्शंत्वाच केलं, सिमारेषेच्या पलिकडे जाऊन केलं, असंख्य खाच खळगे सोशुन केलं,तुम्हच्या राजकारणाचा, शोषित, पिढीत, वंचित,ज्याला वाणी नाही, ज्याला वाली नाही ज्याला नैसर्गिंक शारिरीक कमतरता आहे, अशा गोर-गरीबांना केंद्रबिंदु ठेवुन समाजकारणातुन राजकारण केलं. साहेब कर्तृत्ववान आणि सामाजिक बांधीलकी जपणारे एक हळवे यक्तिमत्व होते. तसेच मराठा समाजाचे निर्भयपणे नेतृत्व करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न तुम्ही केला.प्रत्येक समाजाच्या विविध प्रश्नांवर तुम्ही तातडीने तालुका, जिल्हा,राज्य व केंद्रशासनाकडे निवेदनाद्वारे कैफियत मांडत.वेळप्रसंगी बैठका, मोर्चा ,आंदोलनाच्या माध्यमातून प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी तुम्ही सतत झटत असत.महाराष्ट्रातील सर्व बहुजन समाजात लोकप्रिय असल्याने खऱ्या अर्थाने तुमच्या सारख्या लोकनेत्याला मुकलो आहोत.खरच साहेबांचा परिसस्पर्श खूप थोड्या दिवसासाठी लाभला.असा एकही दिवस नाही की तुमची आठवण येत नाही.
प्रथम पुण्यस्मरणार्थं भावपुर्णं अभिवादन

रामधन दत्तात्रय ठोंबरे
रा.दहीफळ (वडमाऊली) ता.केज जि.बीड
मो.9960929360

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.