वयाने लहान पण मनाने मोठ्या दिलाचा राजा जाहेर..!
वाढदिवसानिमित्त विशेष लेख

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज/प्रतिनिधी
भाऊ मोठा असो वा छोटा असो. बहीण भावाचं किंवा भावाभावांचं नातं हे खूपच गोड असतं. त्यांच्यामध्ये छोट्या छोट्या कुरबुरी असतात पण दोघांनाही माहीत असतं की, त्यांचं एकमेकांवर किती प्रेम आहे. पण असं कधी होतं की, ते एकमेकांवरचं प्रेम दाखवत नाहीत. अशावेळी मिळणारी उत्तम संधी म्हणजे 15 ऑगस्ट रोजी असणारा वाढदिवस.
प्रत्येकाचे भावाचे नाते वेगळे असते. आजच्या आधुनिक युगामध्ये लहान सहान गोष्टीवर भाऊ भावांनो नाराज होताना दिसत आहे परंतु माझा लहान भाऊ माझ्यापेक्षा लहान असून सुद्धा मनाने खूप मोठा आहे याची परिचिती मला पावलोपावली येत आहे. माझ्या सुख दुःखामध्ये सदैव खंबीरपणे उभा राहणारा माझा भाऊ म्हणजे जाहेरच. कुटुंबापासून दूर नोकरीसाठी कोल्हापूरला शिक्षक म्हणून नोकरीला असून सुद्धा सदैव एक भाऊ म्हणून जी काळजी घेतो माझ्या सर्व परिवाराची , आई वडिलांची ही उल्लेखनीय बाब आहे.
समाजामध्ये प्रत्येक जाती-धर्माचे मित्र घेऊन सदैव मित्रात राहणारा, सर्व मित्रांना आपलेसे करणारा इतकेच नव्हे तर माझ्या भावाने प्रत्येक मित्राच्या मनात घर केलेले दिसून येते. समाजामध्ये वावरत असताना मित्रांना येणाऱ्या अडीअडचणी व मित्रांच्या सुखदुःखात ही ज्या त्यावेळी एक अतूट मैत्रीचं नातं जपत सदैव खंबीरपणाने मित्राच्या पाठीशी राहण्याचे काम ही करत आहे.
भावा शेवटी तुझ्यासाठी मी एवढेच म्हणेन तू लहान भाऊ आहेस म्हणून काय झाले, मोठे मोठे काम करण्याची क्षमता तुझ्यात आहे, अशा माझ्या लाडक्या लहान भावास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. परमेश्वर तुला पुढील आयुष्य निरोगी व भरभराटीचे देवो हीच प्रार्थना करतो. तुझा मोठा भाऊ डॉ.जावेद शेख.
शब्दांकन -: डॉ.जावेद शेख
अध्यक्ष
सह्याद्री मराठी पत्रकार संघ केज