सम्राट अशोक माध्यमिक विद्यालय गोटेगाव शाळेची विद्यार्थिनी कु. दिपाली बोराडे हिचे तालुका स्तरीय निबंध स्पर्धेत घवघवीत यश
मा.तहसीलदार व मा.शिक्षणाधिकारी केज तालुका यांच्या हस्ते तहसिल कार्यालय केज येथे संपन्न झाला पारितोषिक वितरण समारंभ

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज मिडीया
केज प्रतिनिधी
केज तालुक्यातील मौजे गोटेगाव येथील सम्राट अशोक माध्यमिक विद्यालय शाळेची विद्यार्थिनी कु . दिपाली सर्जेराव बोराडे हिचा शिक्षण विभाग व तहसिल कार्यालय यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केज तालुका स्तरीय निबंध स्पर्धेत केज तालुक्यातील अनेक शाळांनी सहभाग नोंदविला होता . याच स्पर्धेत मौजे गोटेगाव येथील सम्राट अशोक माध्यमिक विद्यालयाच्या जवळपास 60 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता सदरील स्पर्धेत वर्ग 8 वीत शिकत असलेली विद्यार्थीनी कु . दिपाली बोराडे हिने “मराठवाडा मुक्ती संग्रामाचे महत्व” या विषयावर गुणवत्तापूर्ण निबंध लिहत तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला सदरील स्पर्धेचे बक्षीस वितरण तहसिल कार्यालय केज येथे केजचे सन्मानीय तहसिलदार व सन्माननीय शिक्षणाधिकारी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला व केज तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन तालुक्यातील नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक उपस्थितांनी केले यावेळी गुणवंत विद्यार्थी यांच्या पालकांनी आनंदोत्सव साजरा केला व स्पर्धेचे भरभरुन कौतुक केले असुन गोटेगावची कन्या व सम्राट अशोक माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी म्हणून तिचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत असुन सदरील स्पर्धेचा निकाल समजताच शाळेच्या वतीने उपस्थित गावच्या सरपंच , उपसरपंच ,व ग्रामसेवक , मुख्याध्यापक , शिक्षकवृंद यांच्या हस्ते शाळेच्या परिसरात सत्कार करुन कौतुक केले व पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
शाळेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब करपे , अध्यक्ष भिकाजी जोगदंड , सचिव अंकुश करपे , मुख्याध्यापक श्रीमती साखरे , यांनी स्पर्धेत सहभागी विद्यार्थी व तालुका स्तरीय निबंध स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांनीचे अभिनंदन केले असुन सदरील स्पर्धेचे यशस्वी आयोजन शाळेतील जेष्ठ शिक्षक श्री सावंत , श्री खरबड , श्रीमती गायकवाड , श्री पवार , श्री , केदार , श्री शिनगारे , श्री कदम , श्रीमती चौधरी यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी श्री बचुटे , श्री करपे, श्री निरडे यांनी यशस्वी आयोजन केले व शाळेतील विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .