सावळेश्वर येथे 74 वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात साजरा
गावातील गुणवंतांचा ग्रामपंचायत व पाणी फाउंडेशन टिमच्या वतीने विशेष गुणगौरव सोहळा संपन्न

गावातील गुणवंतांचा ग्रामपंचायत व पाणी फाउंडेशन टिमच्या वतीने विशेष गुणगौरव सोहळा संपन्न .
केज प्रतिनिधी
केज तालुक्यातील मौजे सावळेश्वर पै ग्रामपंचायत कार्यालयात नवनिर्वाचित सरपंच श्री मारुती कांबळे यांनी ध्वजारोहण केले तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे डॉ. सौ.भाग्यश्री मस्के यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
विशेष बाब म्हणजे ग्रामपंचायत कार्यालय व पाणी फाउंडेशन टीम यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील भूमिपुत्रांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला होता यामध्ये अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला त्यामध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी पात्र झालेला. निरज मदन मस्के तसेच इतर गावातील गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींचा पुष्पगुच्छ ट्रॉफी शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यामध्ये कोमल अविनाश पवार .तेजस विजय करपे .वैष्णवी विशाल पवार .आदिती व्यंकट मस्के. सचिन बालासाहेब डोंगरे . विशाल विलास मस्के. शिवशंकर रामभाऊ मस्के .विनोद शिवाजी खोत .सुशांत चंद्रकांत पोतदार .नामदेव अशोक पवार.सुशांत महादेव जगदाळे व ज्युनिअर आयएएस परीक्षेत महाराष्ट्र राज्य रँक 19 ने उत्तीर्ण झालेला प्रतीक गणेश दौंड यांचा समावेश होता या कार्यक्रमात गावचे सरपंच मारुती कांबळे उपसरपंच अंकुश करपे पाणी फाउंडेशनचे अनिल करपे डॉ.शिवाजी मस्के ग्रामपंचायत सदस्य अशोक वामन मस्के .उषा शामसुंदर दौंड. भाग्यश्री सुंदर पवार .हरिबाई शिवाजी पवार सावित्राबाई दिलीपराव जगदाळे तसेच अण्णासाहेब जगदाळे माजी सरपंच सुंदर पवार सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन बापूराव पवार युवराज दादा पवार ह. भ. प. शिवाजी महाराज ,उमेश मुरलीधर मस्के, बबनराव जगदाळे, सचिन जगदाळे तसेच गावातील समस्त गावकरी मंडळ , शिक्षक , विद्यार्थी , शिक्षण प्रेमी यांची बहुसंख्याने उपस्थित होती. या कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक येथील शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.शिवाजी मस्के यांनी केले तर आभार प्रदर्शन सुंदर पवार यांनी केले .