आवसगाव येथे नवरात्र उत्सवानिमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत देवी तुळजाभवानी देवीच्या ज्योतीचे उत्साहात आगमन
घरोघरी केले जाते देवीच्या ज्योतीचे पुजन व स्वागत

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष
केज तालुका प्रतिनिधी / महादेव दौंड
नवरात्रौत्सव विशेष बातमी…
केज तालुक्यातील मौजे आवसगाव/ वाकडी या गावी मागील अनेक वर्षांपासून परंपरागत चालत असलेल्या नवरात्र उत्सवानिमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत देव तुळजाभवानी मातेच्या ज्योतीचे आगमन मौजे आवसगाव क्षेत्र तुळजापूर येथुन आज सकाळी पहाटे उत्साहात झाले असुन गावातील युवा पिढीच्या माध्यमातून अनेकजण नवरात्र उत्सवाच्या आदल्या दिवशी तुळजापूरकडे रवाना होतात व आई तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यातील ज्योतीला मौजे आवसगाच्या देवीची ज्योत प्रज्वलित करून आपल्या गावाकडे मार्गक्रमण करत एक एक गाव करत पायी चालत ज्योत (मशाला) पाहाटे गावाच्या शिवारात आल्यावर समस्त गावकरी समाजबांधव लहान थोर आबालवृद्ध यांच्या सहभागाने ज्योत असण्यासाठी गेलेल्या देवी भक्तांचे व ज्योतीचे मनोभावे पूजन करुन नवरात्र उत्सवाची सुरुवात करतात यावेळी मौजे आवसगातील देवींच्या गाभाऱ्यातील दिवे ज्योतीने प्रज्वलित करण्यात येतात व आशा या नयनरम्य वातावरणात गावातील नवरात्र उत्सवाची सुरुवात करण्यात येते .
नवरात्रौत्सवा निमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा ..