जागतिक बधिरीकरण दिनानिमित्त अंबाजोगाईत एक दिवसीय परिषदेचे आयोजन
पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील डॉक्टरांची उपस्थिती

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचा बधिरीकरण शास्त्र विभाग व इंडियन मेडिकल असोसिएशन, शाखा अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक बधिरीकरण दिनाचे’ औचित्य साधून रविवार, दिनांक 15 ऑक्टोबर रोजी ‘ऑब्स्टेट्रिक्स ऍनेस्थेसिया आणि ऍनाल्जेसिया’ या विषयावर एक दिवसीय परिषद संपन्न झाली.
या परिषदेच्या अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे हे होते. त्यांनी अशा प्रकारच्या परिषदा नियमित घ्याव्यात व राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन अंबाजोगाई येथे करावे ही अपेक्षा व्यक्त करीत, सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तर सुरूवातीला बधिरकरण शास्त्र विभागप्रमुख डॉ.अभिमन्यू तरकसे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी परिषद घेण्यामागची भूमिका विषद केली. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून इंडियन सोसायटी ऑफ ऍनेस्थेसियाचे अध्यक्ष डॉ.लक्ष्मीनारायण लोहिया, इंडियन मेडिकल असोसिएशन, अंबाजोगाईचे अध्यक्ष डॉ.नवनाथ घुगे, अंबाजोगाई मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.राहुल धाकडे, स्वाराती मेडिसिन विभागप्रमुख डॉ.सिद्धेश्वर बिराजदार, डॉ.ज्योती सूळ (लातुर) यांची प्रमुख उपस्थिती होती. या परिषदेमध्ये डॉ.अभिमन्यू तरकसे, डॉ.ज्योती सूळ, डॉ.अपर्णा कुलकर्णी, डॉ.राजश्री धाकडे, डॉ.महेश चोपडे यांनी विविध विषयावरील अभ्यासपूर्ण संशोधन प्रबंधांचे सादरीकरण केले. यावेळी चेअरपर्सन म्हणून डॉ.सुनीता धुळे, डॉ.सुनिल जाधव, डॉ.अर्शद, डॉ.नितीन चाटे, डॉ.अनिल भुतडा, डॉ.गणेश तोंडगे, डॉ.स्नेहल होळांबे, डॉ.अर्चना थोरात आणि डॉ.शालिनी कराड यांची उपस्थिती होती. या परिषदेचे सूत्रसंचालन डॉ.मोनिका पंढरे आणि सहभागी सर्वांचे आभार डॉ.शायनी यांनी मानले. हि परीषद यशस्वी करण्यासाठी डॉ.विनोद जोशी, डॉ.निलेश तोष्णिवाल, डॉ.अरूणा केंद्रे, डॉ.प्रसाद सुळे, डॉ.वृषाली राजगिरे, डॉ.गणेश खंदारकर, डॉ.पौर्णिमा पांचाळ, डॉ.आदित्य पवार, डॉ.प्रवीण शेरखाने, डॉ.अक्षय राठोड, डॉ.सोमनाथ घोरपडे, डॉ.प्रियंका चव्हाण, डॉ.पल्लवी दळवी आदींसह आयोजकांनी परिश्रम घेतले. या परिषदेसाठी डॉ.शैलेश चव्हाण (विभागप्रमुख लातुर), डॉ.संजय चव्हाण, डॉ.प्रशांत देशपांडे, डॉ.विश्वजीत पवार, डॉ.शिवाजी काकडे यांच्यासह अहमदनगर, लातुर, माजलगाव, परळी, नांदेड, औरंगाबाद, अंबाजोगाई येथील डॉक्टरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.