सह्याद्री मराठी पत्रकार संघाच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी बीड आरोळी वार्ताचे संपादक विनोद शिंदे यांची निवड
तर बीड जिल्हा सचिवपदी पत्रकार सय्यद अर्शद यांची नियुक्ती

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष
बीड जिल्हा विशेष
बुधवार दि. 2 आक्टोबर रोजी बीड येथील शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र राज्य पातळीवर पत्रकारांचे वैचारिक, सामाजिक तसेच न्याय मागण्यासाठी कार्यरत असणाऱ्या सह्याद्री मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य हा संघ कार्यरत असुन सदरील संघाच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी बीड आरोळी वार्ताचे संपादक विनोद शिंदे यांची तर सचिवपदी पत्रकार सय्यद अर्शद यांची संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ जावेद शेख यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी सह्याद्री मराठी पत्रकार संघ स्थापन करण्यात आला आहे .
बीड जिल्ह्यतील पत्रकारासाठी बांधवाच्या हितासाठी कार्यरत असणाऱ्या सहयाद्री मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकार सक्षमीकरण साठी प्रयत्न केले जाणार आहेत.पत्रकार कुटुंबियांना कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देऊन जास्तीत जास्त पत्रकार सभासद संघटनेला जोडले जाणार आहेत.
पत्रकार विनोद शिंदे व सय्यद अर्शद यांचा अनुभव खूप मोठा आहे त्यामूळे यांना सहयाद्री मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्ष पदी विनोद शिंदे व सचिव पदी सय्यद अर्शद यांची निवड करण्यात आली आहे. या वेळी संघाचे अध्यक्ष गोविंद नाना शिनगारे व कार्याध्यक्ष शहाजी भोसले यांनी व सर्व पदाधिकारी यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.