सह्याद्री मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य लोगोचे अनावरण
पत्रकार संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केले राज्यस्तरीय लोगोचे अनावरण

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी
सह्याद्री मराठी पत्रकार संघाच्या लोगोचे अनावरण
महाराष्ट्र राज्यातील गाव ,शहर, सर्कल, गण ,तालुका , जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर प्रामुख्याने पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत लोकशाहीचा मुख्य स्तंभ असलेल्या विविध प्रसारमाध्यमांच्या वैचारिक जडणघडणीतुन व समाजाभिमुख पत्रकार बांधवांच्या वैचारिक कृतिशील विचारातून राज्यातील पत्रकारीता क्षेत्रातील समविचारी मंडळींनी एकत्र येत पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर काम करण्यासाठी सह्याद्री मराठी पत्रकार संघाची स्थापना करण्याचा संकल्प करत मागील एक वर्षापूर्वी पत्रकार संघाची स्थापना विविध नवसंकल्पना घेऊन करण्यात आली असून सदरील संघाच्या राज्य लोगोचे अनावरण संघाचे पदसिद्ध मुख्य पदाधिकारी डॉ जावेद शेख , गोविंद शिनगारे , शिवाजी औसेकर, शहाजी भोसले ,अनिल ठोंबरे, डॉ लतिफ शेख , मनोराम पवार , बळीराम लोकरे , गोविंद लांडगे , महादेव दौंड , काशीनाथ कातमांडे, दत्तात्रय भाकरे , यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले असुन पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सह्याद्री मराठी पत्रकार संघाची स्थापना करून महाराष्ट्र राज्यातील पत्रकार बांधवांना सह्याद्री मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य ही संघटना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर राहणार आहे. सह्याद्री मराठी पत्रकार संघाच्या लोगो मध्ये पत्रकारांना आवश्यक असणारी लेखणीची तेवती मशाल व त्या लेखणी मधून समाजाच्या असणाऱ्या भावना व्यक्त करण्याचे चित्र दर्शवण्यात आले आहे.
लवकरच सह्याद्री मराठी पत्रकार संघाच्या राज्य , विभाग व जिल्हा कार्यकारणीची होणार घोषणा
शासकीय विश्रामगृह केज येथे पार पडलेल्या संघाच्या बैठकीत चर्चा विचारविनिमय करून एकमताने निर्णय घेण्यात आला यावेळी उपस्थित सर्वांनी आपापली मते मांडली व बैठक उत्साहात संपन्न झाली .