आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रवैभवशाली महाराष्ट्र न्युज

2023 ची शिक्षक भरती पारदर्शक पद्धतीने करा

युवाशाही संघटनेच्या अध्यक्षा अश्विनी कडू यांची मागणी

केज/प्रतिनिधी (महादेव दौंड)

शिक्षक भरती ही पवित्र पोर्टल अंतर्गत दिलेल्या नियमानुसार करण्यात यावी. ही भरती मेरिटनुसार करण्यात यावी शैक्षणिक व व्यावसायिक अर्थात तसेच सर्व कागदपत्र यात जात प्रवर्ग, समांतर आरक्षण ही सर्व परीक्षेच्या आवेदन पत्र करण्याच्या शेवटच्या दिवसाची 12 फेब्रुवारी ग्राह्य धरण्यात यावी अशी मागणी युवाशाहीच्या संस्थापक अध्यक्षा अश्विनी कडू यांनी केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिक्षण मंत्री, शालेय शिक्षण विभागाचे सचिव आदींना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 2010 पासून बंद असलेले शिक्षक भरती 2017 पासून सुरू झाली यापूर्वी शिक्षक भरती करताना गैरप्रकार होत असेल अनियमितता असायची त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान व्हायचे परिणामी विद्यार्थ्यांना गुणवत्ताधारक शिक्षक मिळावा या हेतूने शिक्षक भरती करण्यासाठी त्यात मेरिटनुसार शिक्षक घेण्यासाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेण्याच्या आयोजन केले. 2017 मध्ये शिक्षक भरती मध्ये नियमावली तयार केली त्यामध्ये शैक्षणिक अन्यथा आणि व्यावसायिकाऱ्याचा आरक्षण कोणत्या द्वारे भरती करायची रिक्त पदांच्या जाहिराती याची पूर्ण माहिती दिलेली आहे असे असताना देखील जाणीवपूर्वक शिक्षण विभाग अधिकारी वर्ग याकडे सध्या दुर्लक्ष करत आहेत आता याची पुनरावृत्ती 2022 -23 च्या शिक्षक भरती मध्ये होताना दिसत आहे अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा पहिली झाल्यानंतर दुसरी परीक्षा सहा महिन्यानंतर व्हायला पाहिजे पण 2017 नंतर ही परीक्षा 2022 ला जाहीर झाली फेब्रुवारी 2022 ला ही परीक्षा घेणार होते परंतु टीईटी घोटाळ्यामुळे ही परीक्षा पुढे गेली ही 2022 -23 ची थेट परीक्षेची परीक्षा देणे आयबीपीएस मार्फत आयोजन केले त्यानंतर परीक्षेचे नोटिफिकेशन डिसेंबर 2022 पूर्वी जाहीर करण्याचे सांगितले होते परंतु शिक्षण विभागाच्या संत गतीमुळे हे नोटिफिकेशन 31 जानेवारी 2023 ला निघाले सात फेब्रुवारी 2023 ला परीक्षा परिषदेने प्रसिद्ध पत्रक देऊन व्यावसायिक पात्रतेत बदल केला यात सीटीईटी ॲपीयर ला संधी देण्याचे कारण काय असेल असा प्रश्न निर्माण होत आहे कारण याच भरती मधून आधी टीईटी उमेदवार बाहेर होते पण त्यावर कोणतीही कारवाई न करता उलट सीटिईटी ॲपीयर असलेल्या उमेदवारांना अभय देण्याचा निर्णय घेतल्यामुळे टीईटी बोगस उमेदवारांना या भरतीत संधी मिळेल हेतूने हा नियम डावलण्यात आलेला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आगामी शिक्षक भरती नियमाने व पारदर्शक पद्धतीने करावी अशी मागणी युवाशाही संघटनेतून करण्यात आली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.