ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर घाटे आळी मर रोगाचा प्रादुर्भाव
वैभवशाली महाराष्ट्र न्यूज

केज तालुका कृषी विशेष
केज /प्रतिनिधी : केज तालुक्यातील परिसरात अवकाळी पावसाने रब्बी पिकांना काहींसा दिलासा मिळाला असला तरी हरभरा पिकावर साध्य घाटे अळी, मर व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून येत आहे.अपुऱ्या पावसामुळे आधीच पातळ उगवण झाली पुन्हा विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता अधिक आहे. मात्र महागडी औषधे फवारणीचा आर्थिक भार शेतकऱ्यांना सोसावा लागणार आहे.
माळेगाव परिसरात खरीप हंगामात सोयाबीनचा पेरा सर्व झाला होता. सोयाबीन ऐन बहरात आल्यानंतर पावसाचा खंड पडल्यामुळे उत्पन्नात मोठी घट झाली.शेवटी परतीच्या पावसाने सुध्दा पाठ फिरवली परिणामी जमिनीत पुरेशी ओल नसल्याने रब्बीच्या पेरणीत मोठी घट झाली.शेतकऱ्यांनी उसनवारी करून व्याजाने पैसे काढुन हारभरा,गव्हु, ज्वारी पिकांची पेरणी केली.त्यात कमी पाण्यावर येणारे पीक म्हणून हरभऱ्या पिकाची सर्वाधिक पेरणी झाली आहे.पण इथंही संकट थांबण्याचे नाव घेत नाहीत.नुकताच झालेला अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे मोठ्या प्रमाणावर घाटे आळी, मर,बुरशी आशा विविध रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने रब्बी हंगामातील पिके पुन्हा संकटात सापडली आहेत. कधी अवकाळी पाऊस तर कधी पावसाचा खंड त्यात आणखी भर म्हणजे वातावरणात अचानक होणारे बदल यामुळे शेती पिकावर अनिष्ट परिणाम होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
सध्या हरभरा पिकावर घाटे अळी चा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे.प्रती एकरी 02 कामगंध सापळे व 10 पक्षी थांबे उभारावेत.
तसेच रासायनिक नियंत्रण साठी इमामेक्टीन बेंझोएट (५ टक्के ) 4.4 ग्रॅम अथवा फ्लूबेंडामाईड 39.35 एस सी 3 मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
तसेच हरभऱ्याचा चांगला फुटवा होण्यासाठी १२ : ६१ : ०० या फॉलियर ग्रेड विद्राव्य खताची ८० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करणे आवश्यक आहे.
सागर पठाडे,
तालुका कृषी अधिकारी केज.