प्रचंड लोकसंग्रह जमविणारे आडसकर तात्या राजकारणातले ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व होते – जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख
बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे लोकनेते बाबुरावजी आडसकर यांना अभिवादन

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष
अंबाजोगाई (प्रतिनिधी) दिवंगत लोकनेते बाबुरावजी आडसकर यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख म्हणाले की, तात्या हे जाणते, विकासाची दृष्टी असणारे रांगडे नेतृत्व होते. एक धुरंधर राजकारणी म्हणून त्यांना महाराष्ट्र ओळखतो. नव्या पिढीसाठी ते मार्गदर्शक व आधारवड होते. त्यांनी दिग्गज राजकीय विरोधकांना आस्मान दाखविले, लोक त्यालाच हाबाडा दिला असे म्हणतात. प्रचंड लोकसंग्रह जमविणारे आडसकर तात्या राजकारणातले जिवंत ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व होते. त्यांना आपल्यातून देहरूपाने जावून आता आठ वर्षे होत आली आहेत. तरी परंतु, त्यांचे कार्य, विचार व आठवण होत नाही असा एकही दिवस जात नाही. असे भावोद्गार बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी काढले. बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लोकनेते बाबुरावजी आडसकर यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष देशमुख हे बोलत होते.
शहरातील लोकनेते यशवंतराव चव्हाण चौक परिसरातील “काॅंग्रेस भवन” येथे बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवार, दिनांक 2 डिसेंबर रोजी ९३ व्या जयंतीनिमित्त लोकनेते बाबुरावजी आडसकर यांना अभिवादन करण्यात आले. प्रारंभी तात्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले. यावेळी बी जिल्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, हणमंतराव मोरे, वसंतराव मोरे, पत्रकार प्रकाश लखेरा, राहुल मोरे, गीतकार बी.एस.जोगदंड, प्रविण देशमुख, अशोक देशमुख, अमित सोळंके, किरण उबाळे आदींसह मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख हे म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणात हबाडा फेम म्हणून वेगळी ओळख असलेले केज तालुक्यातील आडस या गावचे माजी आमदार बाबूरावजी आडसकर साहेब यांच्या नसण्याने बीड जिल्ह्याने एक कणखर राजकीय नेता गमावला आहे. तात्यांच्या नसण्याने बीड जिल्हा राजकीय व सामाजिकदृष्ट्या पाेरका झाल्याची भावना आजही बीडकर व्यक्त करतात हे विशेष होय. मराठवाड्यात ज्या काळी शेतकरी कामगार पक्ष हा पाळेमुळे घट्ट रोवून उभा होता, त्याकाळी कम्युनिस्ट विचारधारा नवी झेप घेत होती, त्या काळात कलापथकाच्या माध्यमातून तात्यांनी तरूण वयातच राजकीय क्षेत्रात वाटचाल सुरू केली. त्याकाळी समाजवादी विचारांनी भारावलेले तरूण एकीकडे आणि कम्युनिस्ट विचारधारा जोपासत जिल्ह्याच्या राजकारणात बाबूराव आडसकर या नांवाचा उदय १९६५ मध्ये झाला. केज पंचायत समितीच्या निवडणुकीत तरूणांनी नेता म्हणून आडसकर साहेब यांना पुढे केले. पहिल्याच निवडणुकीत आडसकरांनी विजय मिळविला. पुढे सभापतिपदाचा कार्यकाळ पूर्ण हाेण्याआधीच १९६८ मध्ये केज विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली. तात्या हे सलग तीन वेळा पंचायत समितीचे सभापती राहिले. बीड पंचायत समितीवर तात्यांनी अनेक वर्षे वर्चस्व मिळविले होते. आडसकर साहेब ८६ व्या वर्षीही नव्या पिढीशी ते सातत्यपूर्ण संवाद साधून होते. मिशा, भाषा, भारदस्त आवाज, ग्रामीण पेहराव, प्रभावी जनसंपर्क, सर्वसामान्यात मिसळणारे असे तात्यांचे रांगडे व्यक्तीमत्व होते. केजच्या निवडणुकीत विजय संपादन करून तात्या पहिल्यांदा आमदार झाले. अभ्यास दौऱ्यासाठी ते रशियाला ही गेले होते. त्यांच्या विरोधात त्याकाळी बीड जिल्ह्यात तसेच शेजारच्या जिल्ह्यातील दिग्गज राजकीय नेते, बडे प्रस्थ असताना ही सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन तात्यांनी निवडणुका लढवून त्या लिलया जिंकल्या हे विशेष होय. प्रचंड लोकसंग्रह जमविणारे आडसकर तात्या राजकारणातले जिवंत ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व होते. त्यांना आपल्यातून देहरूपाने जावून आता आठ वर्षे होत आली आहेत. तरी परंतु, त्यांचे कार्य, विचार व आठवण होत नाही असा एकही दिवस जात नाही. असे भावोद्गार बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी काढले.