येडेश्वरी साखर कारखाना युनिट नं.१ आनंदगाव सारणी कारखान्याचा पहिला हप्ता २७५०/- प्रमाणे शेतक-यांच्या खात्यात वर्ग
कृषी विशेष

समृद्ध महाराष्ट्राच्या सर्वांगिण बातम्यांसाठी…
वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष
केज प्रतिनिधी/महादेव दौंड
केज तालुक्यातील आनंदगाव सा. येथील येडेश्वरी साखर कारखान्याचा गळित हंगाम २०२३-२४ मध्ये गाळपास आलेल्या ऊसाचा दि. ०१/११/२०२३ ते १५/११/२०२३ कालावधीचा पहिला हप्ता २७५०/- प्रमाणे देउन बीड जिल्हयात सर्वाधीक भाव देणारा कारखाना ठरला आहे. कारखान्याचा १० वा गळीत हंगाम दि. ०१/११/२०२३ रोजी सुरु असुन दि.०४/१२/२०२३ पर्यंत ३३ दिवसात १,७७,७१३ मे.टन उसाचे गाळप केले आहे. व डिस्टीलरी विभागातून इथेनॉल ३०७६८१३ लि. आर.एस. ४८२४८९२ लि. उत्पादीत झाले आहे. व को-जन विभागातुन एकुण विज निमिर्ती युनिट ६३३८३००, एक्सपोर्ट २४८४००० युनिट कारखाना वापर ३८५४३०० युनिट.
तरी सर्व शेतकरी सभासदांनी यांनी चालु गळीत हंगामात जास्तीत जास्त कारखान्यास ऊस देवून सहकार्य करावे असे आवाहन चेअरमन बजरंग सोनवणे यांनी केले आहे. येडेश्वरी साखर कारखाना नेहमीच शेतक-यांचे हित जोपासणारा व मराठवाडयात सर्वाधिक उसाला भाव देणारा कारखाना म्हणुन एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.