मनोज जरांगे पाटील यांच्या बोरीसावरगाव येथील सभेचे गावोगावी निमंत्रण
गावोगावी मराठा समाज बांधवांची जोरदार तयारी सुरू

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष
केज तालुका प्रतिनिधी
केज / :मराठा समाजाला शिक्षण व नोकरी मध्ये ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांची केज तालुक्यातील बोरीसावरगाव येथे दिनांक १२ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता जाहीर महासभा आयोजित करण्यात आली आहे.या महासभेचे निमंत्रण देण्यासाठी व जागृतीसाठी सकल मराठा समाज केज व संयोजन समिती यांच्यावतीने मंगळवारी (दि ५) माळेगाव,साळेगाव, मांगवडगाव, सातेफळ यासह तालुक्यातील चिंचोली माळी,मस्साजोग, नांदुरघाट, विडा सर्कल मधील सर्व गावात जाऊन कॉर्नर बैठका घेऊन जनजागृती करण्यात येत आहे. जरांगे पाटलाच्या सभेचे निमंत्रण देण्यात येत आहे.सभा यशस्वी होण्यासाठी मराठा समाजाने एकजूट दाखवून प्रचंड संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संयोजन समितीकडून करण्यात आले आहे. तर केज तालुक्यात कॉर्नर बैठकांना गावोगावी चांगला प्रतिसाद मिळत असून सभा विक्रमी सभा होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.