वसुंधरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पैठण येथे महापरिनिर्वाण दिन साजरा

केज तालुका प्रतिनिधी/ महादेव दौंड
केज / ज्ञानाचा अथांग महासागर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन वसुंधरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पैठण मध्ये साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक सुशीलकुमार गायकवाड प्रमुख पाहुणे अशोक चौधरी सर हनुमंत चौधरी सर नवनाथ गायकवाड सर काकासाहेब वाटाणे सर होते या कार्यक्रमात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी विनम्र अभिवादन करण्यात आले.
6 डिसेंबर सर्व विश्वासाठी दुःखाचा दिवस आहे.प्रज्ञासूर्य, कोटी कोटी जनतेचा मार्गदाता, विद्वतेचा महामेरू, विचारांचा धगधगता ज्वालामुखी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते असे मुख्याध्यापक सुशीलकुमार गायकवाड यांनी विचारातून अभिवादन केले. या कार्यक्रमासाठी दीपक लोकरे सर शशिकांत पवार सर अतुल साखरे सर, अमित शिनगारे सर,मनोज शिनगारे सर उत्तरेश्वर चौधरी अशोक गायकवाड संभाजी सोनवणे कुंदन मस्के व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.