खा.रजनीताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप
केज तालुका अध्यक्ष प्रविण खोडसे यांचा स्तुत्य उपक्रम

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष
केज /प्रतिनिधी
केज तालुक्याच्या भूमीकन्या आपल्या गावासह जिल्ह्याचे नाव देश पातळीवर उज्वल करणाऱ्या राज्यसभेच्या खासदार तथा जम्मू काश्मिरच्या काँग्रेसच्या प्रभारी खा.रजनीताई अशोकराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त केज तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष प्रवीण खोडसे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
उत्कृष्ट संसद रत्न अशी जनमानसात ओळख असणाऱ्या,गांधी घराण्याशी एकनिष्ठ राज्यसभेच्या खा.रजनीताई पाटील यांचा वाढदिवस दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमानी साजरा होत असतो.याही वर्षी तालुकाध्यक्ष प्रवीण खोडसे यांच्या संकल्पनेतून खा.रजनीताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नायगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत तसेच धनेगाव कॅम्प येथील जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी केज तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष प्रवीण खोडसे, नायगांव जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक धनंजय गुजर,सहशिक्षिका सौ.देवणिकर,सौ. काचगुंडे,धनेगाव कॅम्प येथील जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष दत्तात्रय मुजमुले,सहशिक्षिका निवेदिता मुजमुले,सहशिक्षिका जैनब शेख यांच्यासह इतर उपस्थित होते.