बोरी सावरगाव येथील सभेच्या पार्श्वभूमीवर केज तालुक्यात मराठा महा रॅली संपन्न !
तालुक्यातील शहर व गावागावातून सकल मराठा समाज बांधवाचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष
केज तालुका प्रतिनिधी
(१२ तारखेला मोठ्या संख्येने हजर राहण्याचे आवाहन)
—————————–
केज दि.१०(प्रतिनिधी) मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांची सभा केज तालुक्यातील बोरी सावरगाव येथे होणार असून या पार्श्वभूमीवर रविवारी केज तालुक्यात माराठा महा रॅली आयोजित करण्यात आली होती यामध्ये हजारोच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित झाले होते.
मनोज जरांगे पाटील यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा समारोप १२ रोजी होणार आहे व तो बीड जिल्ह्यातील सभानी होणार असून शेवटच्या दिवशीची पहिली सभा ही केज तालुक्यातील बोरी सावरगाव येथे बनसारोळा रोड लगत असलेल्या मुळे नामक काही शेतकरी बांधवांच्या शेतात होत आहे. या सभेची तयारी आता अंतिम टप्प्यात असून याच निमित्ताने रविवारी सकाळी ९ वाजता सभा स्थळा पासून या महा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली यावेळी बोरी सावरगाव येथून, औंरंगपुर, सावळेश्वर, पैठण, पाथरा, युसुफ वडगाव, गोटेगाव, सुकळी फाटा, माळेगाव, साळेगाव, चिंचोली फाटा मार्गे केज शहरातील शारदा इंग्लिश स्कूल या ठिकाणी थांबून परत केज शहरातून पुढे रामराव पाटील महा विद्यालयाचे ग्राउंड वरून पुढे ढाकेफळ, कुंबेफळ, चंदन सावरगाव, होळ, लोखंडी सावरगाव फाटा, डिघोळ अंबा, पळसखेड मार्गे सभास्थळी दाखल झाली यावेळी हजारो मोटासायकलस्वार व चार चाकी गा देखील यामध्ये सहभागी झाल्या होत्या.