राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवक तालुकाध्यक्ष पदी कैलास चाळक यांची नियुक्ती
युवा कार्यकर्ते कैलास चाळक यांच्या निवडीने मित्र परिवारानी दिल्या भरभरून शुभेच्छा

राजकीय विशेष
केज/प्रतिनिधी / महादेव दौंड
केज तालुक्यातील लहुरी येथील रहिवासी कैलास चाळक यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या केज तालुका युवक तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
याविषयी सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील लहुरी येथील रहिवासी व सामाजिक व राजकीय क्षेत्रात अविरत कार्यरत असलेले धडाडीचे कार्यकर्ते कैलास चाळक यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. जयंतराव पाटील व बीड जिल्हाध्यक्ष मा. श्री. संदिप क्षीरसागर, महेबुब भाई शेख व माजी आमदार मा. पृथ्वीराज साठे यांच्या मान्यतेने व माजी मंत्री मा. जयसिंगराव गायकवाड यांच्या हस्ते केज तालुका युवक तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा खा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या विकासात आपण भरीव कार्य करणार व पक्ष संघटना मजबुतीने उभी करणार असल्याचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष कैलास चाळक यांनी यावेळी मत व्यक्त केले.
या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
यावेळी माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड, माजी आमदार पृथ्वीराज साठे, तालुका अध्यक्ष शंकर जाधव साहेब, महिला आघाडी तालुकाध्यक्षा तस्लीमा शेख, युवराज मगर .गव्हाणे साहेब, इनामदार, जाधव साहेब, पदम पाटील, दत्ता चाळक, सामाजिक न्याय केज तालुका अध्यक्ष अक्षय मुजमुले. व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.