आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

संकल्प विद्या मंदिर शाळेत राष्ट्रीय गणित दिन साजरा

शिक्षण क्षेत्रात तळमळीने कार्य करणारी शाळा म्हणजे संकल्प विद्या मंदिर होय- केंद्रप्रमुख कमलाकर कापसे

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष

=======================

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

संकल्प विद्या मंदिर येथे शुक्रवार, दिनांक २२ डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिनाच्या निमित्ताने गणित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

प्रारंभी थोर गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहरातील रविवार पेठ केंद्राचे केंद्रप्रमुख कमलाकर कापसे यांच्या हस्ते गणित प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका रेखाताई बडे, संस्थाप्रमुख कैलास चोले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध मॉडेल्स तसेच गणितातील अभ्यासक्रमाशी निगडित असणारे साहित्य निर्मिती केली होती. यामध्ये बँकेशी निगडित असणारे सर्व साहित्य, गणिताच्या विविध संकल्पना मांडणारे प्रोजेक्ट यांचा समावेश होता. यामध्ये इयत्ता पहिली सेमी माध्यमातून प्रथम – कु.साई वाकडे, द्वितीय – क्रमांक चि.श्रेया शिंदे, इयत्ता पहिली इंग्लिश माध्यमातून मधून प्रथम क्रमांक कु.आदिती गीत्ते तर द्वितीय क्रमांक चि.शिवेंद्र डांगे, इयत्ता दुसरी इंग्लिश माध्यमातून चि.आरव आपेट, चि.ओमकार राठोड, इयत्ता दुसरी सेमी माध्यमातून चि.पार्थ कोपले, कु.प्रांजली चव्हाण, इयत्ता तिसरी इंग्लिश माध्यमातून चि.शौर्य सुरवसे, कु.भूमिका भाबरदोडे इयत्ता तिसरी सेमी माध्यमातून चि.ऋजूल इंगळे, कु.श्रेया निकम, इयत्ता चौथी सेमी माध्यमातून कु.श्रावणी राजमाने, कु.आनंदी काटे, इयत्ता चौथी इंग्लिश माध्यमातून कु.संस्कृती चव्हाण, कु.ज्ञानेश्वरी कदम, इयत्ता पाचवी इंग्लिश माध्यमातून चि.शौर्य घाडगे, कु.बरीरा पठाण, इयत्ता पाचवी सेमी माध्यमातून चि.कुलदीप गंगणे, चि.समर्थ गुट्टे इयत्ता सहावी मधून चि.प्रतीक जाधव, कु.समृध्दी खोडसे, कु.शर्वरी चौरे, इयत्ता सातवी मधून चि.प्रणव बडे, चि.ओमकार लोमटे, आठवी मधून चि.सार्थक गीत्ते, चि.पार्थ चव्हाण या विद्यार्थ्यांनी विविध मॉडेल्स बनवून क्रमांक प्राप्त केले. त्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे विशेष कौतुक करून अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध गणित मॉडेल्सची पाहणी केंद्रप्रमुख कमलाकर कापसे तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंद यांनी केली. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच गणित शिक्षक व्ही.बी.गायकवाड, श्रीमती एस.एस.सुरवसे, श्रीमती घोडके. श्रीमती एस.एम.स्वामी यांचा ही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विशेष सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी अध्यक्षीय समारोप करताना शाळेतील सातत्यपूर्ण सुरू असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करून विद्यार्थ्यांनी बनविलेल्या विविध साहित्य निर्मितीबद्दल विद्यार्थ्यांना नवचेतना मिळेल गणित हे आपल्या जीवनातील अविभाज्य घटक आहे असे उद्गार काढून विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले. या उद्बोधक कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणित विषयाचे शिक्षक व्ही.बी.गायकवाड यांनी केले. तर सूत्रसंचालन श्रीमती हरंगुळे यांनी करून उपस्थितांचे आभार श्रीमती एस.एस.सुरवसे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गणित विषयातील शिक्षक व्ही.बी.गायकवाड व त्यांना सहकार्य करणारे इतर सर्व गणित विषयाच्या शिक्षकांनी उत्कृष्ट असे नियोजन करून गणित प्रदर्शन यशस्वीरित्या संपन्न केले.

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.