राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( शरद पवार) गटाकडून बीड जिल्हा सरचिटणीसपदी डॉ. उत्तम खोडसे यांची निवड
वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष

वैभवशाली महाराष्ट्र /राजकीय
केज/ प्रतिनिधी / महादेव दौंड
दि. 28 रोजी राष्ट्रवादी भवन बीड येथे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली यामध्ये आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार तळागाळातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचले पाहिजेत यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासोबतच जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांच्या निवडी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आल्या. यामध्ये अनेक वर्षापासून राजकारणात व समाजकारणामध्ये अग्रेसर असलेले डॉ. उत्तम खोडसे यांची बीड जिल्हा सरचिटणीस पदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्री जयंतराव पाटील साहेब यांच्या मान्यतेने बीड जिल्ह्याचे अध्यक्ष आमदार संदीप भैया क्षिरसागर यांच्या हस्ते सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ.उत्तम खोडसे साहेब यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.