शिवाजी दादा ठोंबरे राज्यस्तरीय “समाज भूषण”पुरस्काराने सन्मानित .

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
केज/प्रतिनिधि
गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक,राजकीय तथा उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या छावा मराठा संघटनेचे जिल्हाप्रमुख शिवाजी दादा ठोंबरे यांच्या कार्याची दखल घेऊन ग्लोबल स्कॉलर फाऊंडेशन, पुणे यांच्या वतीने राज्यस्तरीय “समाज भूषण”पुरस्कार 2024 देऊन गौरविण्यात आले.
समाजसेवा हीच ईश्वरसेवा समजून आपल्या दैनंदिन जीवनात उपेक्षित, वंचित,शेतकरी,बहुजन समाज घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आग्रही भूमिका घेणारे त्याचबरोरीने मराठा आरक्षणातील सक्रिय व खमक्या नेतृत्व या सर्व बाबींचा नोंद घेता 7 जानेवारी रोजी पुणे येथील यशादा ऑडिटेरिएम येथे ‘पद्मश्री सूधारक ओल्वे’ यांच्या हस्ते राज्यस्तरीय “समाज भूषण”पुरस्कार 2024 प्रदान करून गौरविण्यात आले.
चौकट :- हा पुरस्कार म्हणजे चांगल्या कामाची पावतीच आणि लढण्यासाठी प्रेरणाच आहे.महाराष्ट्र शासनाने पद्मश्री देऊन गौरव केलेल्या महान व्यक्तीच्या हाताने हा पुरस्कार स्वीकारला हे भाग्यच :- शिवाजी दादा ठोंबरे
राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार 2024