माणुसकीचा आधार फाऊंडेशन केज ,या संस्थेला आरोग्य उपक्रमासाठी आजीच्या स्मृती निमित्त दिला बेड भेट
डॉ.पांचाळ परिवाराचे उत्तरदायित्व सर्वत्र कौतुकाचा वर्षाव

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज / सामाजिक
केज ता.प्रतिनिधी
केज शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात मागील अनेक दिवसांपासून सामाजिक उपक्रमात आग्रेसर असलेली सामाजिक संस्था म्हणून *माणुसकीचा आधार फाऊंडेशनने* आपल्या कार्याचा ठसा उमटवला असुन फाउंडेशनच्या वैशिष्ट्यपूर्ण कामाची दखल आता विविध क्षेत्रातील मान्यवर घेत आहेत .
याच उपक्रमाचा एक भाग म्हणून डॉ पांचाळ परिवाराने आपल्या आजीच्या स्मृतीनिमित्त आपणही समाजाचे काही देणे लागतो या संकल्पनेतुन एक आरोग्य शिबीरे तथा अत्यावश्यक सेवा गरजुंपर्यंत मिळावी यासाठी फौलर बेड भेट माणुसकीचा आधार फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी यांच्या स्वाधिन केला आहे .
यावेळी माणुसकीचा आधार फाऊंडेशनने सुरू केलेल्या रुग्ण सेवा संकल्प करीता डॉ . लक्ष्मीकांत पांचाळ सर श्री.श्रीकांत पांचाळ सर यांनी त्यांचा आजी स्व.वनारसी लक्ष्मनराव पांचाळ यांच्या स्मरणार्थ घरातील फौलर बेड रुग्ण सेवा संकल्प करिता जमा केला .
याप्रसंगी उपस्थित फाउंडेशनचे सर्व मेंबर -डॉ निखिल भालेराव, श्री विकास गवळी, डॉ विवेकानंद डोईफोडे ,महावीर पटेकर , अजित धपाटे, योगेश वैरागे,प्रताप वैरागे,परमेश्वर बोबडे,डॉ कृष्णा सूर्यवंशी,अमर धपाटे,निलेश तोडकर सह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.