काळेगाव हायस्कूल काळेगाव (घाट) शाळेची शैक्षणिक सहल संपन्न

शैक्षणिक विशेष
केज/प्रतिनिधी .
शिवकृपा विद्या प्रसारक मंडळ दहिफळ वडमाऊली या संस्थेचे अध्यक्ष श्री. सखाहारी( तात्या )गदळे यांच्या मार्गदर्शनाखाली
काळेगाव हायस्कूल काळेगाव (घाट) या शाळेची सहल दिनांक 9/1/2024 ते 14/1/2024 एकूण पाच दिवसांची सहल संपन्न झाली. या सहलीमध्ये एकूण 40 मुली व 40 मुले अशा दोन बसेस मधून विद्यार्थ्यांनी सहलीचा आनंद घेतला. सहलीचा प्रवास पंढरपूर , नरसिंह वाडी, कोल्हापूर, कन्हेरी मठ ,आदमापुर, राधानगरी, तारकली मालवण,येथे पहिला मुक्काम करून दुसऱ्या दिवशी आचरा, कणकेश्वर, विजयदुर्ग ,देवगड, आडीपरी, रत्नागिरी, गणपतीपुळे येथे तिसरा मुक्काम करुन सकाळी डेरवण, महाड, रायगड, प्रतापगड, महाबळेश्वर, पाचगणी, नारायणपूर, बालाजी मंदिर जेजुरी,बारामती, जामखेड करून काळेगाव हायस्कूल काळेगाव घाट येथे परत आली. या सहली मधून विद्यार्थ्यांनी सर्व ऐतिहासिक स्थळ व पर्यटन स्थळांची आनंद घेत माहिती मिळवली. या पाच दिवसाच्या नियोजनासाठी काळेगाव हायस्कूल काळेगाव घाट तथा काळेगाव उच्च माध्यमिक विद्यालय काळेगाव घाट चे प्राचार्य श्री. राहुल गदळे यांनी स्वतः सहली सोबत राहून नियोजन केल्यामुळे पाच दिवसाची सहल आनंदात पार पडली. शाळेतील शिक्षक श्री. भांगे पी.एम. ढाकणे एम.एम,खेडकर बी.जी., गायकवाड बी.एम., मोरे एस.एस., घुले के.एस. , यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री.अशोक कोठावळे, नितीन कोठावळे, रामराव हराळे यांनी विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था योग्यरित्या पार पडली. सहल यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री.राहुल गदळे यांनी वेळोवेळी विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केल्यामुळे पाच दिवसाची सहल आनंद उत्साहात यशस्वी संपन्न झाली.सहल यशस्वीरीत्या पार पाडल्या बद्दलपालकांनी प्राचार्य श्री. राहुल गदळे यांचे कौतुक केले.