आपला जिल्हावैभवशाली महाराष्ट्र न्युज

एक देश, एक निवडणूक” याबाबत अंबाजोगाईत संविधानप्रेमी नागरिक एकवटले

_बैठक घेऊन दिले हरकती, सूचनांचे निवेदन_

 

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

“एक देश, एक निवडणूक” याबाबत अंबाजोगाईत संविधानप्रेमी नागरिक एकवटले आहेत. याप्रश्नी रविवारी बैठक घेऊन सोमवार, दिनांक १५ जानेवारी रोजी हरकती, सूचना मांडणारे एक प्रातिनिधिक स्वरूपातील निवेदन मा.रामनाथ कोविंद (माजी राष्ट्रपती तथा अध्यक्ष, “एक देश, एक निवडणूक” विचारार्थ समिती, नवी दिल्ली) यांना उपजिल्हाधिकारी, अंबाजोगाई यांच्या मार्फत देण्यात आले आहे.

 

 

“एक देश, एक निवडणूक” या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर अंबाजोगाई शहरातील संविधानप्रेमी नागरिक एकवटले आहेत. याप्रश्नी रविवारी बैठक घेऊन सोमवारी प्रातिनिधिक स्वरूपात एक निवेदन देण्याचे सर्वानुमते ठरले. दिलेल्या निवेदनात एकूण १८ विविध सुचना व हरकती नमूद करण्यात आल्या आहेत. ज्यात निवडणूक प्रक्रिया ही कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय अत्यंत गोपनीय, पारदर्शक पद्धतीने राबविणे, निवडणूक प्रक्रियेतील सर्व गैरप्रकार रोखणे, मतदार संघाची पुनर्रचना करणे, अनुसूचित जाती-जमातीची लोकसंख्या वाढली असून त्याप्रमाणात राखीव जागांमध्ये वाढ करावी, क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये बदल करणे, निवडणूक प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यासाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध करणे, मतदारसंघाचा विकास, विकास निधी, खासदार, आमदार यांना प्रतिनिधीत्व करण्यास मर्यादा, कायद्याने बंधन आणणे, खासदार, आमदार यांचे पेंशन बंद करणे, संविधानातील पूर्वीच्या तरतुदीनुसार निवडणूक आयुक्ताच्या नियुक्तीसाठी सर्वोच्च न्यायालयाचा एक प्रतिनिधी असावा, ईव्हीएम मशिनद्वारे निवडणूका न घेता बॅलेट पेपरवर निवडणूका घेतल्या जाव्यात, भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी शासनप्रणाली असून ती भारतीय संविधानामुळे यशस्वी झाली आहे हे लक्षात घेऊन संविधानाचे पावित्र्य जपले पाहिजे, लोककल्याण हेच संविधानाचे “लक्ष्य” आहे. हे सरकारने लक्षात ठेवले पाहिजे. अशा एकूण १८ विविध विस्तृत सुचना व हरकतींचा निवेदनात समावेश आहे. सदरील निवेदनावर ज्येष्ठ संपादक प्रा.नानासाहेब गाठाळ, माजी आमदार पृथ्विराज साठे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरद पवार गट), सामाजिक कार्यकर्ते ऍड.अनंतराव जगतकर, ज्येष्ठ नेते प्रा.एस.के.जोगदंड, कॉ.बब्रुवाहन पोटभरे (सीपीएम), प्राचार्य डॉ कमलाकर कांबळे, प्रा.डी.जी.धाकडे, भाई मोहन गुंड (शेकाप), संयोजक ऍड.माणिक आदमाने (बीआरएसपी), ऍड.शिवाजी कांबळे (समाजवादी पक्ष), लंकेश वैद्य, सुखदेव भुंबे, तारेख अली उस्मानी, सुर्यभान बगाडे, भगवान ढगे, उत्तम जोगदंड, प्रा.संभाजी बनसोडे, देवानंद जोगदंड, चंद्रकांत वडमारे, ज्ञानोबा रोकडे, व्यंकटेश चामनर, भारत वेडे, राजेश परदेशी, ऍड.सुनिल सौंदरमल, निखिल शिंदे, धनराज सोनवणे, सुधाताई जोगदंड, सुचिता सोनवणे, शोभा बनसोडे, पुष्पा बगाडे, विजया कांबळे, ए.आर.नंदनवरे, आश्रूबा कांबळे, वसंत वाघमारे, व्यंकट वेडे, ई.सी.सुरवसे, किरण सोनवणे, माधव काळे, बाबासाहेब धन्वे, वसंत दहिवाडे, विलास जोगदंड, राजु शिंदे, वसंत जोगदंड, ऍड.एस.के.पठाण, लक्ष्मण भोकरे यांच्यासह अनेक संविधानप्रेमी नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.