महाराष्ट्रवैभवशाली महाराष्ट्र न्युजसामाजिक

मुंबई येथे मराठा आरक्षणासाठी गेलेल्या मौजे आवसगावच्या विर मराठा मावळ्यांचे पुणे येथे जंगी स्वागत

नवी सदाशिव पेठ पुणेचे नगरसेवक अनिल भाऊ वांजळे , उद्योजक मराठा बांधव महेश जाधव व बाळराजे शिनगारे यांनी केले भव्य दिव्य स्वागत.

मराठा आरक्षण विशेष

पुणे प्रतिनिधी

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज

मराठा समाज नवी पेठ

मराठा समाज आरक्षण जल्लोष करत साखर वाटून समाजाचे व इतर समाज बांधवांचे तोंड गोड केले तसेच अनिलभाऊ वांजळे पाटील यांनी मराठा क्रांती मोर्चातील सहभागी मराठा समाज बांधवांचा सत्कार केला याप्रसंगी सुधीरभाऊ काळे, गुंजाळभाऊ, आनंतभाऊ गांजवे, महेशभाऊ चोरघे,संजयभाऊ पवार मुकुंदजी दमाले, दत्ताजी गायकवाड, बाळासाहेब काळभोर, जयेश शेलार, नितीन दहिभाते, दिलीप बेंद्रे, तानाजी लोकरे, तसेच मराठा समाज नवी पेठ, सदाशिव पेठ, मराठा क्रांती मोर्चा यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती यावेळी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सकल मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा नवी पेठ , सदाशिव पेठ व मराठा विकास आघाडीच्या वतीने मा.अनिलभाऊ वांजळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले .

(पुणे विशेष)केज तालुक्यातील मौजे आवसगावच्या 7 मराठा मावळ्यांनी मराठा आरक्षण लढाईत सहभागी होत मराठा योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मुंबईतल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबई गाठली यात प्रामुख्याने आवसगावचे मराठा बांधव १) शिवश्री संतोष शिनगारे ,२) श्री सर्जेराव अच्युतराव साखरे ३) श्री बन्सी गुंडींबा शिनगारे ४) श्री अशोक सुरेश साखरे ५) श्री विष्णू राजेंद्र साखरे ६) श्री नितीन भाऊसाहेब साखरे ७) अमोल सुर्यकांत साखरे  यासह चालक श्री उदमुले काका व भुमिपुत्रांनी जुनी म्हण पुन्हा सार्थकी लावली असुन आपल्या मराठा समाजाच्या भविष्यासाठी मुंबईच्या दिशेने आगेकूच करत

वेडात दौडले वीर मराठे सात 🚩

याचा प्रत्यय आणुन देत

“एक मराठा  – कोट मराठा”

घोषणा यावेळी यशस्वी करून दाखवत योध्दा व मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आरक्षण लढाईला खंबीर साथ व पाठिंबा देण्यासाठी मुंबई गाठली व शिवरायांचे स्वाभिमानी मावळ्यांची भुमिका हाती घेत आवसगावची मान स्वाभिमानाने उंचावत ठेवली आणि मराठा स्वाभिमान शिवरायांचे लढवय्या मावळे महाराष्ट्राचा बुलंद आवाज मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांची साथ देत अखेर आज विजयी गुलालाची उधळण करुनच परतीचा प्रवास सुरू करत आवसगावच्या विर मराठा मावळ्यांनी आनंदोत्सव साजरा केला याप्रसंगी पुणे येथे आल्यावर पुणेचे नगरसेवक समाजभूषण सन्माननीय श्री अनिल भाऊ वांजळे यांनी या सात मराठा योध्दांचा भव्य दिव्य सत्कार पुणे येथे करुन जंगी स्वागत करुन मराठा खडा तो सबसे बडा आसे गौरवोद्गार काढुन आपल्या समाजातील लढवय्या मावळ्यांचे जंगी स्वागत करुन आनंदोत्सव साजरा केला तसेच गणेश टि सेंटरचे संचालक महेश जाधव यांनी आपल्या समाजबांधवांसाठी यावेळी अन्नदान करुन विशेष सहकार्य केले व यावेळी  सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मौजे आवसगावचे मराठा बांधव तथा सदैव मराठा आरक्षणासाठी सक्रीय सहभागी असणारे सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेले युवा कार्यकर्ते बाळराजे शिनगारे , सुनील शिनगारे , इंजिनिअर दत्तात्रय शिनगारे , जय खाडाप , वैभव सर्जेराव साखरे , ज्ञानेश्वर कविदास शिनगारे , विश्वजित साखरे इत्यादी मौजे आवसगावचे भुमिपुत्रांची याप्रसंगी उपस्थित होती .

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.