२६ आठवडे वय, कमी वजन असलेल्या जुळ्या बाळांना दिले लाड रूग्णालयाने जीवदान
आरोग्य विशेष

आरोग्य विशेष
================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
जन्मावेळी कमी महिने भरलेले, २६ आठवडे वय, एकाचे वजन ८०० चे ग्रॅम, दुसऱ्याचे वजन ९०० ग्रॅम, त्यात ही गंभीर बाब म्हणजे फुफ्फुसात संसर्ग झालेल्या दोन जुळ्या बाळांना डॉ.विजय लाड यांच्या योग्य निदान आणि औषधोपचारामुळे लाड रूग्णालयात जीवदान मिळाले. आपली जुळी बाळं सुखरूप आहेत. हे पाहून जुळ्या बाळांच्या पालकांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद झळकत होता.
याबाबत अधिक माहिती देताना सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ.विजय लाड यांनी सांगितले की, जन्मावेळी कमी महिने भरलेले, २६ आठवडे वय, एकाचे वजन ८०० चे ग्रॅम, दुसऱ्याचे वजन ९०० ग्रॅम, त्यात ही गंभीर बाब म्हणजे फुफ्फुसात संसर्ग झालेल्या परळी वैजेनाथ येथील दोन जुळ्या बाळांना श्वास घ्यायला त्रास होत होता म्हणून अंबाजोगाईच्या लाड हॉस्पिटल मध्ये आणण्यात आले. त्या दोन्ही बाळांच्या सर्व तपासण्या केल्यानंतर समजले की, बाळांचे फुफ्फुस हे खूपच कमजोर आहे. त्यानंतर आम्ही सदर बाळाच्या पालकांना ही गंभीर बाब निदर्शनास आणून दिली. योग्य निदान केले. काय औषधोपचार करावे लागतात. याबाबत अधिक माहिती दिली. उपचारापूर्वी पालकांची अनुमती घेऊन तातडीने बाळांच्या फुफ्फुसांमध्ये इंजेक्शन देण्यात आले, आणि बाळांना व्हेंटिलेटर या मशीनवर ठेवण्यात आले. त्यानंतर काही तासांतच बाळांमध्ये हळूहळू सुधारणा होत गेली. दोन्ही बाळांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. हे लक्षात येताच बाळांना लावलेली मोठी मशीन काढण्यात आली. आणि छोटी मशीन लावण्यात आली. दोन्ही बाळं ही हळूहळू ऑक्सिजनवर शिफ्ट करण्यात आली. त्यानंतर त्या बाळांना आईचे दूध देणे सुरू करण्यात आले. जसं – जसे बाळांना दूध पचत होते. तस तसे दुधाची मात्रा वाढविण्यात आली. ज्यावेळेस बाळाला जेवढे दूध लागते. तेवढेच दूध ते घेत होते. तब्बल दिड महिन्यांच्या योग्य उपचारांनंतर हि बाळं त्यांच्या आईकडे शिफ्ट करण्यात आली. ज्यावेळेस बाळांचे वजन वाढले आहे. अशी डॉ.विजय लाड यांची खात्री झाली, आणि पालकांनी समाधान व्यक्त केले. त्यानंतरच त्या बाळांना रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली. अतिशय गंभीर अवस्थेत असलेल्या बाळांना लाड हाॅस्पिटल मध्ये एकप्रकारे नवे जीवदानच मिळाले त्यामुळे बाळाच्या पालकांनी डॉ.विजय लाड व हॉस्पिटल मधील कर्मचारी विजय क्षीरसागर, सादिक शेख, मोहन या सर्व कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले. यापूर्वी ही लाड हॉस्पिटल मध्ये अनेक बालकांवर योग्य औषधोपचार करण्यात आले आहेत. अन्ननलिका पूर्ण विकसित झालेली नसणे, नाड्या कमजोर असणे, शरीरामध्ये जीवाणूचा संसर्ग झालेला असणे. कमजोर असलेल्या बाळांमध्ये ऑपरेशन करणे, जोखीम पत्करून योग्य निदान व औषधोपचार करणे, प्रसंगी बाळांचे सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी शस्त्रक्रिया करणे, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, एक्स-रे, निष्णात भुलतज्ज्ञ अशा विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम डॉ.विजय लाड व त्यांच्या लाड हॉस्पिटल मधील स्टाफ हे अव्याहतपणे करतात. सर्वजण खूप मेहनत घेतात हे उल्लेखनीय आहे.