सुशीलादेवी देशमुख महाविद्यालयाचे प्रा.शिवाजी मोहाळे राज्यस्तरिय ” उत्कृष्ट संपर्क अधिकारी पुरस्कार २०२४ ” ने सन्मानित
वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष

महाराष्ट्र राज्य विशेष
वैभवशाली महाराष्ट्र न्यूज :- प्रतिनिधी
श्रीमती सुशीलादेवी देशमुख वरिष्ठ महाविद्यालय,लातूर चे राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. शिवाजी मोहाळे यांच्या कार्याची दखल घेत बुधवार दि.२४-०१-२०२४ रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय महाराष्ट्र राज्य, जय हिंद महाविद्यालय चर्चगेट, मुंबई, जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय मुंबई शहर व मुंबई उपनगर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिना निमित्त झालेल्या कार्यक्रमात सन २०२३ मध्ये निवडणूक साक्षरता मंडळ ( ELC ) च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये मताधिकार, निवडणूक व लोकशाही यासंबधी केलेली जनजागृती,त्यासाठी राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रम, नवमतदार नोंदनी या कार्याबद्दल राज्यस्तरिय ” उत्कृष्ट संपर्क अधिकारी पुरस्कार २०२४ ” ने महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी मा.श्री.श्रीकांत देशपांडे साहेबांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सन्मान प्रसंगी मंचावर चित्रपट अभ्यासक डॉ संतोष पठारे, दिग्दर्शक संदिप सावंत, लेखिका डॉ. निर्मीही फडके लेखक समीक्षक प्रा. अभिजित देशपांडे दिग्दर्शक प्रकाश कुंठे.अभिनेता विकास पाटील निवडणूक सदिच्छादुत -तृतिय पंथी प्रणित हाटे, निवडणूक सदिच्छादुत – दिव्याग निलेश संगीत, प्राचार्य विजय दाभोलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
मूळचे परभणी येथील असलेले प्रा. डॉ. शिवाजी मोहाळे हे २५ वर्षांपासून श्रीमती सुशीलादेवी देशमुख वरिष्ठ महाविद्यालय,लातूर येथे कार्यरत आहेत. सध्या समाजशास्त्र विभागाचे प्रमुख देखील ते आहेत. शिवाजी महाविद्यालय,परभणी येथून १९९६ साली M.A.( Political Science ) ही पदवी संपादन केली आहे. तर २००९ साली यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक येथून महाराष्ट्राच्या बहुजनवादी चळवळीत महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे योगदान ” या विषयात M.Phil पूर्ण झाले. त्यांचे “इतर मागासवर्गीय समाजाच्या राजकिय सहभागाचा अभ्यास ( विशेष संदर्भ लातूर जिल्हा ) या विषयात संशोधन सुरू असून स्वामी रामानंद तीर्थक्षेत्र मराठवाडा विद्यापीठ,नांदेड येथे Ph.D.करत आहेत.
त्यांच्या या कार्याबद्दल व यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.दिलीपरावजी देशमुख ( माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य), सचिव आमदार अमितजी देशमुख ( माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य), सर्व संचालक मंडळ,मांजरा चॅरिटेबल ट्रस्टचे प्रशासकीय अधिकारी व प्राचार्य डॉ.अजय पाटील सर,प्रा. शंकरराव चव्हाण सर, वर्शिप अर्थ फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी तेजस गुजराती,जिल्हा समन्वयक आकाश सोनकांबळे,समन्वयक प्रा.दादासाहेब लोंढे, निवडणूक साक्षरता मंडळाचे पदाधिकारी प्रा. डॉ.कांबळे बी.ए,प्रा डॉ.विजयकुमार मेकेवाड,प्रा. डॉ वेदप्रकाश मलवाडे,प्रा.अनिता गायकवाड,प्रा. डॉ गायकवाड यु.टी.प्रा संजयादेवी पवार,प्रा. डॉ.पांडूरंग शितोळे.प्रा. डॉ सौ.सविता किर्ते प्रा. डॉ.कुमार बनसोडे,प्रा. डॉ.शंकरानंद येडले प्रा. डॉ सौ.सुरेखा बनकर प्रा. डॉ.पलमंटे माधव,प्रा. देशमुख जी.एस. तसेच कार्यालयीन सहकारी प्राध्यापक व कर्मचारी, मित्रपरिवार, नातेवाईक व समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.