वृद्धाश्रमात अन्नदान करुन राजवीर (राणा) व रिया गदळे चा वाढदिवस साजरा
श्री.राहुल गदळे यांचा अनोखा उपक्रम

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष
केज /प्रतिनिधी
समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, म्हणून आपला मुलगा राजवीर गदळे व मुलगी रिया गदळे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करावा, जेणेकरून याचा गरीब गरजू लोकांना फायदा होईल. भुके को अन्न, प्यासे को पाणी याप्रमाणे युवा नेते तथा काळेगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य राहुल गदळे यांनी आपला मुलगा राजवीर गदळे व रिया गदळे या वाढदिवसानिमित्त आपला परिवार कळसंबर ता.जि.बीड वृद्धाश्रमात दोन वेळचे जेवण देऊन वृद्धाश्रमातच वाढदिवस साजरा करण्यात आला. आजच्या काळात मोठ्या हॉटेलमध्ये मोठ्या उत्साहात व धामधुमीत मोठ्या डीजे च्या आवाजामध्ये वाढदिवस साजरा केला जातो परंतु श्री राहुल गदळे यांनी आपल्या मुलांचा वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा करून एक नवीन अनोख्या उपक्रमाला सुरुवात केली आहे असेच म्हणावे लागेल. आपला परिवार या वृद्धाश्रमामध्ये मुलांचा वाढदिवस साजरा केल्यामुळे तेथील वृद्ध महिला व पुरुष यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. वृद्ध महिला व पुरुष वृद्धाश्रमात आपल्या मुलांना घेऊन गेल्यामुळे आपल्या मुलांमध्ये आपल्या आई वडिलांविषयी आदर निर्माण होईल व समाजातील प्रत्येक वडील थोरमंडळींचा आदर आपली मुले करतील आपली संस्कृती टिकून राहील यासाठी समाजातील प्रत्येक पालकांनी आपल्या मुलावर आई वडिलांविषयी प्रेम निर्माण होण्यासाठी अशा प्रकारच्या वृद्धाश्रमामध्ये जाऊन त्यांच्यात मिळून मिसळून वाढदिवस व अन्य उपक्रम घेतले जावेत जेणेकरून आपल्या मुलांमध्ये आपल्या आई वडिलाविषयी प्रेमाची भावना निर्माण होईल त्यामुळे आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात न ठेवता आपण आपल्या आई वडिलांना स्वतःजवळ ठेवून त्यांचा सांभाळ करावा अशी भावना आपल्या मुलांमध्ये निर्माण होईल असे मत श्री राहुल भैया गदळे यांनी बोलताना व्यक्त केले. यावेळी आपला परिवार या वृद्धाश्रमातील वृद्ध महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आपला परिवार या वृद्धाश्रमाचे सदस्य व श्री सखाहरी (तात्या) गदळे, श्री जयदत्त (दहिफळकर) गदळे , सौ उषा राहुल गदळे, सौ भाग्यश्री जयदत्त ( दहिफळकर) गदळे, सौ.जूलेखा जावेद शेख, श्री. जावेद शेख, श्री आकाश ओव्हाळ श्री सचिन मुंडे उपस्थित होते. शेवटी आपला परिवार वृद्धाश्रमाचे सूनिल पवार यांनी वृद्धाश्रमात येऊन वाढदिवस साजरा केल्यामुळे गदळे परिवारांचे आभार मानले.
बातमी संकलन -:डॉ जावेद शेख