शाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालया मध्ये हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न
वैभवशाली महाराष्ट्र न्यूज

केज/प्रतिनिधी
श्री वडमाऊली विद्या प्रसारक मंडळ दहिफळ वडमावली संचलित शाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दहिफळ वडमावली येथे संस्थेच्या प्राचार्या श्रीमती जयश्री ईप्पर (गदळे) मॅडम यांच्या उपस्थितीत हळदी कुंकू मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महिलांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
इयत्ता पाचवी ते दहावीतील मुलींनी व माता पालकांनी या कार्यक्रमात मुख्य करून सहभाग नोंदविला मूळे या कार्यक्रमाचे आकर्षण वाढले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून बाईपण भारी देवा हे जमलेल्या सर्व महिलांनी अनुभवले.
या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन करून झाली. त्यानंतर प्राचार्या .श्रीमती जयश्री ईप्पर(गदळे) मॅडम यांनी मुलींच्या शिक्षणासाठी व सामाजिक कार्य इ.विषयावर सर्वांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.
त्यानंतर श्रीमती कुलकर्णी मॅडम मनोगत व्यक्त केले. गावातील खूप मोठ्या संख्येने महिला उपस्थित होते.व सर्वांनी अतिशय हिररीने सक्रिय सहभाग घेतला.
हा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचक्रोशीतील मधील महिला सर्व मुले मुली लोकप्रतिनिधी यांचे मोलाचे योगदान लाभले. प्राचार्या श्रीमती ईप्पर मॅडम यांनी कार्यक्रमात आलेल्या सर्व महिलांचे तिळगुळ देऊन संस्कृती प्रमाणे तिळगुळ घ्या व गोड गोड बोला असा संदेशही दिला. यावेळी शाम माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय दहिफळ वडमावली शाळेतील सर्व शिक्षक, प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती प्रा.कदम मॅडम यांनी केले., यावेळी श्रीमती प्रा.जाधवर मॅडम,श्रीमती आय.डी. ठोंबरे मॅडम, उपस्थित होत्या.व शेवटी आभार श्रीमती कुलकर्णी मॅडम यांनी मानले.