पिंपळगाव हायस्कूल पिंपळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी
छत्रपती शिवजन्मोत्सव सोहळा -2024

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज/
प्रतिनिधी डॉ जावेद शेख
केज तालुक्यातील पिंपळगाव येथे पिंपळगाव हायस्कूल पिंपळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पिंपळगाव हायस्कूल पिंपळगावचे ज्येष्ठ शिक्षक श्री. ठोंबरे सर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी पिंपळगाव हायस्कूल पिंपळगाव शाळेचे मुख्याध्यापक श्री. ढाकणे एच.ए., यांनी आपले मनोगत व्यक्त करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्याछत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा इतिहास
सांगत असताना म्हटले की
१८७० साली छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्याची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यात केली. पुण्यापासून १०० किमी अंतरावर असलेल्या रायगडावर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. नंतर लोकमान्य टिळकांनी जयंती साजरी करण्याची परंपरा पुढे नेली. यावेळी पिंपळगाव हायस्कूल पिंपळगाव च्या शिक्षिका श्रीमती गायकवाड मॅडम ,शेख मॅडम व शिक्षकेतर कर्मचारी कांबळे गणेश व अमोल वाघ तसेच शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.