छत्रपती शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त मौजे आवसगाव येथे भव्य दिव्य कार्यक्रमांचे आयोजन
शालेय विद्यार्थ्यांच्या रांगोळी, निबंध , वक्तृत्व व सांस्कृतिक स्पर्धा तर शिवव्याख्यान व शाहिरीच्या कार्यक्रमांचेही आयोजन

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
बीड जिल्हा प्रतिनिधी
छत्रपती शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त मौजे आवसगाव येथे भव्य दिव्य कार्यक्रमांचे आयोजन .
शालेय विद्यार्थ्यांच्या रांगोळी, निबंध , वक्तृत्व व सांस्कृतिक स्पर्धा तर शिवव्याख्यान व शाहिरीच्या कार्यक्रमांचेही आयोजन
केज तालुक्यातील मौजे आवसगाव येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी 19 फेब्रुवारी सार्वजनिक छत्रपती शिवजन्मोत्सव सोहळा समिती मौजे आवसगाव यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी भव्य दिव्य शालेय विद्यार्थी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असुन यात प्रामुख्याने दिनांक 23 फेब्रुवारी रोजी रांगोळी स्पर्धा , दिनांक 24 फेब्रुवारी रोजी निबंध स्पर्धा तर दिनांक 25 फेब्रुवारी रोजी वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धा वर्ग 1 ते 4 , वर्ग 5 ते 7 व वर्ग 8 ते 10 या गटात होणार आहेत तसेच दिनांक 26 फेब्रुवारी रोजी युवाव्याख्यात्या श्रुतीताई जाधव यांचे व्याख्यान तर दिनांक 27 फेब्रुवारी रोजी बालशाहीर आविष्कार येडके आणि संच अंबाजोगाई यांचा भारदस्त शाहिरीचा कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे . दिनांक 28 फेब्रुवारी रोजी शालेय विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची स्पर्धा घेण्यात येणार असुन सदरील स्पर्धा वर्ग 1 ते 5 व वर्ग 6 ते 10 या दोन गटात होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली तर सदरील स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके वितरण समारंभ सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर लागलीच करण्यात येणार असुन सदरील शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमास मौजे आवसगाव येथील सर्व लहान थोर मंडळीनी व गावकरी समाज बांधवांनी , पंचक्रोशीतील सर्वांनी उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी हि विनंती आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे .
सदरील स्पर्धेसाठी गावातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी बक्षिस देण्याचे घोषित केले असुन आयोजकांनी सर्वांचे आभार मानले आहेत..