शाम माध्यमिक,उच्च माध्यमिक विद्यालय व शाम गदळे कला व विज्ञान महाविद्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष प्रतिनिधी
डॉ जावेद शेख
केज /प्रतिनिधी
केस तालुक्यातील दहिफळ (वडमाऊली )येथील श्री वडमाऊली विद्या प्रसारक मंडळ संचलित दहिफळ वडमाऊली येथील शाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व शाम कला ,विज्ञान महाविद्यालय मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती श्री वडमाऊली विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव मा.शरद (बप्पा) गदळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली. संस्थेचे सचिव शरद बप्पा गदळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मा विषयी माहिती सांगताना पुढे म्हटले की पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ.स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवाजी महाराजांचे नाव शिवाई या देवतेवरून ठेवण्यात आले. एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती, म्हणून या मुलाचे नाव ‘शिवाजी’ ठेवले गेले. शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले हे मराठा सेनापती होते, ज्यांनी दख्खनच्या सल्तनतची सेवा केली होती. त्यांच्या आई जिजाबाई होत्या, ज्या सिंदखेडच्या लखुजी जाधवरावांच्या कन्या होत्या. शिवाजी महाराज हे मराठा कुटुंबातील आणि भोसले कुळातील होते. अशा प्रकारची जी महाराज यांच्या जन्मा विषयी माहिती सांगितली .यावेळी श्याम माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापिका तथा प्राचार्या सौ.ईप्पर मॅडम व सर्व शिक्षक, प्राध्यापक ,आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.