केज विधानसभेची जागा काँग्रेस पक्षाला सोडण्याची मागणी:- प्रविण खोडसे
राजकीय

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष
केज /प्रतिनिधी
विधानसभा निवडणुका काही दिवसावर येऊन ठेपल्या असताना सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत. त्यातच माजी मंत्री अशोकराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदार संघाचा आढावा घेण्यात आला. यावेळी केज विधानसभा काँग्रेस पक्षाला सोडुन घेण्याची मागणी प्रविण खोडसे यांनी केली आहे.
केज विधानसभा मतदार संघात काँग्रेस पक्षाला जनाधार असुन केजची जनता पंजाच्या शोधत आहे.सर्व धर्म समभाव मानणारा काँग्रेस हा एकमेव पक्ष असल्यामुळे सद्य स्थितीत या मतदारसंघात काँग्रेस पक्षासाठी अनुकूल वातावरण असुन पक्षाला मानणारा मोठा मतदारही या मतदारसंघात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील केज विधानसभेची जागा काँग्रेस पक्षाला सोडून घेऊन कार्यकर्त्यांना न्याय द्यावा अशी मागणी मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या वतीने तालुकाध्यक्ष प्रवीण खोडसे यांनी केली आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देखमुखं,राहुल सोनवणे,पशुपतीनाथ दांगट, प्रवीण कुमार शेप, बाळासाहेब ठोंबरे, कविता ताई कराड, समिर देशपांडे, रणजित खोडसे,संगीता ताई साळवे यांच्यासह अन्य पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.