इरा इंटरनॅशनल इंग्लीश स्कुलचे शिष्यवृत्ती परिक्षेत घवघवीत यश
इरा इंटरनॅशनल स्कूलचे दैदिप्यमान यश

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
केज प्रतिनिधी
केज तालुक्यातील युसुफ वडगाव येथील इरा इंटरनॅशनल इंग्लीश स्कूल च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शिष्यवृत्ती परिक्षेत बसलेले पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
याविषयी सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील युसुफ वडगाव सारख्या ग्रामीण भागात उच्च दर्जाचे शिक्षण देणारी संस्था म्हणून नावारूपाला आलेल्या इरा इंटरनॅशनल इंग्लीश स्कूल च्या विद्यार्थ्यांनी
शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले, तसेच शाळेतील एम.टी.एस परीक्षेस बसलेले सर्व विद्यार्थी 100% उत्तीर्ण झाले.
तसेच सैनिकी स्कूल परीक्षेत हि दोन विदयार्थी उत्तीर्ण झाले,
अशा प्रकारे शैक्षणीक वर्ष 2023-24 मध्ये विवीध स्पर्धा परीक्षे मध्ये शाळेने घवघवीत यश संपादन केले, त्याबद्दल पालक समाधान व्यक्त करत असून शाळेचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे, की ग्रामीण भागात उच्च प्रतीचे शिक्षण देऊन विद्यार्थ्यानं मध्ये स्पर्धा परिक्षे बाबत आवड निर्माण करण्याचे काम शाळा करत आहे,
ग्रामीण भागात सुद्धा शाळा चांगली आसेल तर विदयार्थी घडतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे इरा इंटरनॅशनल इंग्लीश स्कूल युसुफ राम वडगांव गुणवत्ता पूर्ण, परिपूर्ण शिक्षण देण्यासाठी नावाजलेली शाळा असून आजच्या स्पर्धेच्या युगात आपला विदयार्थी टिकला तर पाहिजे, पण त्याने यश हि संपादन केले पाहिजे यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मेहनत घेत असतात.
यश संपादन केलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत असुन पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा विविध क्षेत्रातील नागरिक व शिक्षणप्रेमी देतं आहेत..