छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त गरजवंत शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप व विनम्र अभिवादन कार्यक्रम संपन्न
शिवसेनेचे जिल्हा संघटक नितीन भैय्या धांडे यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी अभिनव उपक्रम

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष
बीड /प्रतिनिधी
(बातमी संकलन- शहाजी भोसले)
छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त गुरुवार दि. 6 जून रोजी शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक बीड येथे महाराजांना विनम्र अभिवादन करण्यात आले शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब,संपर्क नेते सुनील प्रभू, उपनेत्या सुषमाताई अंधारे,संपर्कप्रमुख किशोर पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राथमिक स्वरूपात उपस्थित शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप करण्यात आले
प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त महाराजांना अभिवादन करून शेतकऱ्यांना नितीन भैय्या धांडे यांच्या वतीने बियाणे वाटप जिल्हाप्रमुख गणेश वरेकर, परमेश्वर सातपुते,ओमतात्या खवतड,संभाजी ब्रिगेडचे मराठवाडा अध्यक्ष राहुल वायकर, प्रा.गोपाळ धांडे,बुलंद छावाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल बहीर, स्वप्निल भैया गलधर,नारायण गवते, राष्ट्रीय छावाचे जिल्हाध्यक्ष युवराज मस्के, उपजिल्हाप्रमुख हनुमान जगताप,सुशील पिंगळे तालुका प्रमुख गोरख सिंगम, शहर प्रमुख निजाम भाई,मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेश नाईकवाडे, शिवबा प्रतिष्ठानचे बापूसाहेब जाधव, विद्यार्थी मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष भागवत मस्के,भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हा अध्यक्ष गणेश धोंडरे, संभाजी ब्रिगेड कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत बागलाने, संभाजी सेनेचे जिल्हाध्यक्ष भरत वालेकर,यांच्या प्रमुख उपस्थितीत विनम्र अभिवादन व शेतकऱ्यांना बी-बियाणे वाटप करण्यात आले.
या अभिनव उपक्रमाबद्दल नितीन भैय्या धांडे यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर संजय जाणवळे,अशोक सुखवसे,आजिनाथ आदमाने,जीवन धांडे,दिलदार बहीर,प्रदीप मस्के,जयदत्त थोटे,संजय गोडसे,जगदीश लाखे,जालिंदर धांडे,गणेश तिपाले,लक्ष्मण नरनाळे,मधुकर धांडे,शिवाजी तिपाले,रमेश नवले,सुशील दिवे यांच्यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.