अंबाजोगाईत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्ता बैठकीचे आयोजन
संभाजी ब्रिगेडची विचारधारा समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोंचवणार - जिल्हाध्यक्ष प्रविण ठोंबरे

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
अंबाजोगाई प्रतिनिधी
अंबआगामी काळात होवू घातलेल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी शहरात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्ता बैठकीचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या बैठकीत जिल्हाध्यक्ष प्रविण ठोंबरे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी गोविंद हाके यांची तालुका कार्याध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली.
अंबाजोगाई येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ऍड.मनोज आखरे, प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या बैठकीत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने जे ऐतिहासिक यश संपादन केले आहे. त्याचा आनंद साजरा करून या विजयात आपला मोलाचा वाटा उचलणाऱ्या बीड जिल्ह्यातील सुज्ञ मतदारांचे आभार या बैठकीत मानण्यात आले. आगामी काळात होवू घातलेल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी शहरात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्ता बैठकीचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण उत्तमराव ठोंबरे तर यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष रामकिसन मस्के हे उपस्थित होते. बैठकीच्या सुरूवातीला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन व प्रवर्तनवादी चळवळीतील सर्व महामानवांना अभिवादन करण्यात आले. यावेळी गोविंद हाके यांची तालुका कार्याध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली. हाके यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रविण ठोंबरे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, संभाजी ब्रिगेड या पक्षाने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेशी युती केली असल्याने आगामी काळात ही उबाठा शिवसेनेसोबत विधानसभेसह जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका, कृषी उत्पन्न बाजार समिती या सर्व स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार आहोत. त्यामुळे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी संभाजी ब्रिगेडची विचारधारा शहर, ग्रामीण भागासह समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवावी. बीड (पूर्व) जिल्ह्यात संभाजी ब्रिगेड वॉर्ड निहाय तयारी करीत आहे. लवकरच पक्षाचे वरिष्ठ नेते बीड (पूर्व) जिल्ह्याचा दौरा करून संभाजी ब्रिगेडच्या संघटनात्मक बांधणीचा आढावा घेणार आहेत. बीड पूर्व मध्ये विद्यार्थी, महिला आणि दिव्यांग आघाडी अतिशय मजबूत आहे. त्यामुळे पुढील काळात नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी घोषित करून गावोगावी संभाजी ब्रिगेडच्या शाखा उभारण्यात याव्यात. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ऍड.मनोजदादा आखरे, प्रदेश महासचिव सौरभदादा खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या ध्येयधोरणांसह संघटन अधिक मजबूत करावे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व सामान्यांचे मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. तरच आपल्या पक्षाला आगामी निवडणुकीत यश आल्याशिवाय राहणार नाही. संभाजी ब्रिगेड शंभर टक्के सामाजिक कार्य करतानाच शंभर टक्के राजकारण करण्यासाठी मैदानात उतरलेली संभाजी ब्रिगेड राजकारणाला नवा आयाम दिल्याशिवाय राहणार नाही. सर्वांना जोडणारा विचार म्हणजे संभाजी ब्रिगेड आहे असे मोलाचे मार्गदर्शन जिल्हाध्यक्ष प्रविण ठोंबरे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले. यावेळी ठोंबरे यांनी ही बीड पूर्व मध्ये संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून व आपल्या सर्वांच्या सहकार्य व मार्गदर्शनाखाली अतिशय प्रभावीपणे कार्य करीत आहोत असे सांगितले. विद्यार्थी, महिला, दिव्यांग आघाडी सक्रिय आहे. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहोत. असे सांगून जिल्हाध्यक्ष ठोंबरे यांनी संभाजी ब्रिगेडची राजकीय भूमिका आणि संघटन बांधणी यासंदर्भात माहिती दिली. तर यावेळी बोलताना मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष रामकिसन मस्के यांनी सांगितले की, जिल्हाध्यक्ष प्रविण ठोंबरे यांनी मागील अनेक वर्षांपासून अतिशय चांगले कार्य करून मोठे संघटन उभे केले आहे. आपण चळवळीतून माणसं जोडा. मी व्याख्यान आणि प्रबोधनातून माणसं जोडत आहे. असे सांगून अतिशय उद्बोधक असे मार्गदर्शन करून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा दिली. या प्रसंगी कार्यकर्त्यांना पक्ष बांधणीसाठी येणाऱ्या ज्या अडचणी निर्माण होतात, त्या समस्या ऐकून त्यांचे निवारण केले. या बैठकीत १) या वर्षाभरात आगामी होणाऱ्या सर्व निवडणुका., २) नवीन पदाधिकाऱ्यांची निवडी., ३) शाखा बांधणे व बुथ बांधणी., ४) शेतकरी, विद्यार्थी आणि ५) स्थानिक प्रश्नांवर अतिशय सकारात्मक व मौलिक चर्चा करण्यात आली. या बैठकीस तालुकाध्यक्ष रवींद्र ढगे, जिल्हा सचिव नारायण मुळे, उपजिल्हाध्यक्ष परमेश्वर मिसाळ, तालुका कार्याध्यक्ष गोविंद हाके, शहराध्यक्ष सिद्राम यादव, दत्तात्रय गंगणे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष केशव टेहरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अश्विनीताई यादव, महिला आघाडी तालुकाध्यक्ष सुनंदाताई लोखंडे, जमुनाताई सुरवसे, मुंजा बापू देवकते, पृथ्विराज सोनवणे यांचेसह संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बैठकीचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष रवींद्र ढगे यांनी केले. तर सुत्रसंचालन विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष केशव टेहरे यांनी केले. आणि उपस्थितांचे आभार महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अश्विनीताई यादव यांनी मानले. बैठकीच्या यशस्वितेसाठी अंबाजोगाई तालुक्यासह बीड पूर्व भागातील संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी, विद्यार्थी, महिला, दिव्यांग आघाडी यांच्या वतीने पुढाकार घेण्यात आला.