रामकृष्ण बाल विद्यामंदिर येथे रंगला आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा
सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक विशेष

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष
केज/प्रतिनिधी —
केज येथे प.पू. खंदारे गुरुजींच्या व आईंच्या आशिर्वादाने चालत असलेल्या रामकृष्ण बाल विद्यामंदिर मध्ये देवशयनी आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी दिंडी धारूर रोड मार्गे लाईट ऑफिस मधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पोहचली.दिंडी मध्ये लहान लहान विद्यार्थी विठ्ठल,रुक्मिणी,विविध संत, वारकर्यांच्या वेशभूषा करून सहभागी झाले होते. दिंडीत लहान लहान वारकर्यांनी हातात टाळ-मृदंग-वीणा व वारकरी पताका हाती घेतल्या होत्या. मंदिरात दिंडी पोहचताच विद्यार्थी वारकर्यांनी विठ्ठल रुक्मिणी चे दर्शन घेऊन,भक्तीगीत, तसेच अंभग यांचे गायन केले. त्याचबरोबर भक्तीगीतावर नृत्य करून उपस्थितांकडून दाद मिळवली. यानंतर विद्यार्थी वारकरी,पालक व उपस्थितांना आषाढी एकादशीचा फराळ देवून दिंडीची सांगता करण्यात आली.यावेळी दिंडी सोहळ्यास सौ.मनु भाभी शर्मा,रोहन वेदपाठक,दगडू भैय्या डिकुळे, प्रा.विठ्ठल आवाड सर,प्रा.उत्रेश्वर जाधव सर व सर्व पालक उपस्थित होते.दिंडी सोहळा यशस्वितेसाठी संचालिका सौ.वर्षा मॅडम खंदारे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली सहशिक्षिका सौ.अश्विनी मॅडम ठोंबरे व सौ. निकीता मॅडम देशमुख यांनी परिश्रम घेतले.