राज्यस्तरीय कराटे स्पर्धा 2024- 25 मध्ये केजच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
कराटे प्रशिक्षक अनिल ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळवले यश

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
शालेय क्रिडा विशेष
केज प्रतिनिधी
लातूर येथे झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत केज तालुक्यातील 13 विद्यार्थ्यांनी यश मिळवले या विद्यार्थ्यांनी स्वर्ण रोप्य व कांस्यपदक पटकावले या विद्यार्थ्यांचा केज पोलीस स्टेशन येथे पोलीस उपनिरीक्षक श्री.पाटील साहेब, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री.वाघमारे सर , ठाणे हवलदार श्री.बिकड सर,श्री.दराडे सर, आदी मान्यवर उपस्थित होते.14 वर्षाखालील मुले चैतन्य चाळक सुवर्ण पदक, प्रवीण गाढवे रोप्य पदक, हर्षद काटमांडे कास्य पदक, 13 वर्षाखालील मुले रोप्य पदक, विश्वराज काळे कास्य पदक, दहा वर्षाखालील मुले वरद पाटील रोप्य पदक, रुद्र थोरात कास्य पदक, 12 वर्षाखालील मुली किर्तिका गाढवे रोप्य पदक, शुभ्रा शेटे कास्य पदक,13 वर्षाखालील मुली ऋतुजा गाढवे, कास्य पदक, 11 वर्षाखालील मुली विरा पाटील कास्य पदक, ८ वर्षाखालील मुली दिव्या वाघमारे कास्य पदक, 14 वर्षाखालील मुली अनुष्का डिकले कास्य पदक, यावेळी जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व श्री.अनिल ठोंबरे यांनी केले.