आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणवैभवशाली महाराष्ट्र न्युजसहकार विशेष

सकारात्मक व पारदर्शक कारभारामुळे सभासद, ठेवीदारांचा विश्वास वाढला – अध्यक्ष ऍड.मकरंद पत्की

_दीनदयाळ बँकेची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा_

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज

अंबाजोगाई (वार्ताहर)

सभोवताली नकारात्मक वातावरण असताना देखील सकारात्मक व पारदर्शक कारभारामुळे सभासद, ठेवीदार यांचा विश्वास वाढला आहे. आर्थिक क्षेत्रात वेगाने प्रगतीकडे वाटचाल करणारी बँक म्हणून ही आज दीनदयाळ बँकेकडे पाहिले जाते. सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदु मानून समाजाच्या सर्वच क्षेञात आर्थिकदृष्ट्या संपन्नता आणण्यासाठी दीनदयाळ बँक कटीबध्द आहे. बॅंकींग सेवा योग्य व पारदर्शक ठेवून बॅंकेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. आर्थिक क्षेञात आश्वासक व दमदार पाऊले टाकणा-या दीनदयाळ बँकेला ३१ मार्च २०२४ अखेर २ कोटी ५० लाख रूपयांहून अधिकचा करपूर्व नफा झाला असून बँकेकडून ३ टक्के लाभांश जाहीर करीत असल्याची घोषणा दीनदयाळ बँकेचे अध्यक्ष ऍड.मकरंद पत्की यांनी २८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली.

आर्थिक क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणार्‍या दीनदयाळ नागरी सहकारी बँकेची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. १८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता कै.गोपीनाथराव मुंडे स्मृती सभागृह, खोलेश्‍वर महाविद्यालय, अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर बँकेचे अध्यक्ष ऍड.मकरंद पत्की, उपाध्यक्ष ऍड.राजेश्‍वर देशमुख, बँकेचे संस्थापक अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रा.गो.धाट, संचालक सर्वश्री मकरंद कुलकर्णी, बाळासाहेब देशपांडे, डॉ.विवेक दंडे, प्रा.अशोक लोमटे, प्रा.जयकरण सुरेशकांबळे, तज्ज्ञ संचालक ऍड.अशोक कुलकर्णी, व्यवस्थापकीय सदस्य ऍड.शिवाजीराव कराड, महादेव इटके आणि मुख्यकार्यकारी अधिकारी सनतकुमार बनवसकर या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. वार्षिक सर्वसाधारण सभेचे अध्यक्षस्थान भूषवावे याबाबत सुचक म्हणून सभासद डॉ.श्रीकांत बुट्टे यांनी बँकेचे अध्यक्ष ऍड.मकरंद पत्की यांचे नांव सुचविले तर त्याला सभासद संतोष बनसोडे यांनी अनुमोदन दिले. मान्यवरांनी भारतमाता व पं.दीनदयाळजी उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्ज्वलन केले. प्रार्थनेनंतर उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. विश्वजीत धाट यांनी पद्य गायन केले. त्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभेस प्रारंभ झाला. सुरूवातीला संचालक बाळासाहेब देशपांडे यांनी अहवाल वर्षातील दिवंगतांसाठी श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर सभागृहाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी बँकेचे संगणक विभागप्रमुख मंगेश गोस्वामी यांनी सायबर सेक्युरिटी हा जनजागृतीपर प्रशिक्षण कार्यक्रम सभासदांसाठी सादर केला. तर सहकार विषयातील तज्ज्ञ श्री.रसाळ यांनी सभासदांना सहकार विषयावर प्रशिक्षण दिले. योगेश्वरी देवल कमेटीवर सचिव म्हणून निवड झाल्याबद्दल बँकेचे संचालक प्रा.अशोक लोमटे आणि कोषाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बँकेचे सभासद शिरीष पांडे यांचा बँकेकडून विशेष सत्कार करण्यात आला. तदनंतर आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बँकेच्या शाखांना शाखा पारितोषिके (रोख रक्कम, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह) देऊन सन्मानित करण्यात आले. ज्यात लातूर शाखा (प्रथम), देगलूर शाखा (द्वितीय), बीड शाखा (तृतीय) या शाखांचा समावेश आहे. याप्रसंगी उपस्थित सन्माननीय संचालक व मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी विविध ठराव, प्रस्ताव मांडले. त्याला उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या गजरात मान्यता दिली. सभेच्या अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयावर सकारात्मक व खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली. सभागृहात उपस्थित सभासद रामचंद्र झंवर, डॉ.गोपाळ चौसाळकर, शिरीष पांडे, गोविंद कुडके, विलास सोमवंशी, सिराजे सर, हरिदास आपेट आणि व्यंकटेश पेन्सलवार यांच्यासह इतरांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना मुख्यकार्यकारी अधिकारी बनवसकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत उत्तरे दिली. त्यानंतर अध्यक्षीय समारोप करताना बँकेचे अध्यक्ष ऍड.मकरंद पत्की यांनी सांगितले की, दीनदयाळ बँकेने ग्राहक, ठेवीदार आणि हितचिंतक यांचा विश्‍वास संपादन केला आहे. मागील २८ वर्षांपासून सहकार क्षेत्रात काम करताना बँकेने माणसे जोडण्याचे काम केले आहे. दीनदयाळ बँकेची ३१ मार्च २०२४ (आर्थिक वर्ष २०२३ – २०२४) अखेर आर्थिक वर्षासाठीचे लेखापरीक्षीत आर्थिक परिणाम सांख्यिकीय माहिती पुढीलप्रमाणे आहे (कंसातील सर्व नमुद आकडे हे लाखांत आहेत.) एकूण संकलित ठेवी (५२३४५.३२), एकूण वितरीत कर्जे (३१७९२.०८), एकूण गुंतवणुक (२१८८६.२६), भागभांडवल (१५८१.१९), राखीव निधी (३५.२७ लक्ष), निव्वळ अनुत्पादक कर्जे (नेट एनपीए) चे प्रमाण ४.९८ टक्के एवढे आहे., निव्वळ मालमत्ता (₹३१.४५ कोटी), बँकेकडे (५९०४५.५७) एवढे खेळते भांडवल आहे. बँकेने एकूण (₹८४१.३३ कोटी) एवढा व्यवसाय केला आहे. तर बँकेस तब्बल २ कोटी ५० लाख ५१ हजार रूपये इतका करपूर्व नफा झाला आहे. १९९६ साली लावलेल्या या बँकरूपी रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. सभासदांच्या सहकार्याने बँक उत्तरोत्तर प्रगती करीत आहे. संचालक मंडळाच्या कामाचे स्वरूप सभासदांसमोर ठेवण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात येते. बँकेचे कर्ज वाटप, वसुली, अकाऊंट, लेखापरीक्षण, माहिती तंत्रज्ञान, प्रशासन व ई – सेवा हे सर्व विभाग खूप चांगले काम करीत आहेत. बँकेचे सभासद, कर्मचारी, अधिकारी व संचालक मंडळ यांच्यात सुसंवाद आणि उत्तम समन्वय ठेवण्याचे काम मुख्य कार्यकारी अधिकारी सनतकुमार बनवसकर हे सुरूवातीपासून करीत आहेत. बँकेचे संचालक मकरंद कुलकर्णी व प्रा.जयकरण सुरेशकांबळे यांनी कर्मचारी आणि अधिकारी यांच्या प्रशिक्षणासाठी घेतलेला पुढाकार स्वागतार्ह आहे. प्रशिक्षणामुळे कर्मचारी आणि अधिकारी यांच्यात सकारात्मक बदल दिसून येत आहेत. बँकेने नेहमीच सभासद, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक व हितचिंतक यांचा विश्वास संपादन केला आहे. तत्पर व दर्जेदार बॅंकींग सेवा, सुविधा उपलब्ध करून देत दीनदयाळ बँकेने सहकार क्षेत्रात बिना संस्कार, नही सहकार हा संस्कार जोपासला आहे. एक परिवार म्हणून काम करताना विश्वास, विकास आणि विनम्रता हे ब्रीद घेऊन आश्वासक प्रगती साधली आहे. सुरूवाती पासूनच सामाजिक बांधिलकी मानून ही बँक आर्थिक क्षेत्रात कार्यरत आहे. बँकेच्या सर्वांगीण विकासात बँकेच्या संचालिका तथा आमदार सौ.पंकजाताई गोपीनाथराव मुंडे (पालवे) यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन तर उपाध्यक्ष ऍड.राजेश्‍वर देशमुख, संस्थापक अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रा.गो.धाट, संचालिका सौ.शरयुताई हेबाळकर, संचालक सर्वश्री विजयकुमार कोपले, चैनसुख जाजु, इंजि.बिपीन क्षीरसागर, प्राचार्य किसन पवार, मकरंद कुलकर्णी, बाळासाहेब देशपांडे, डॉ.विवेक दंडे, प्रा.अशोक लोमटे, जयकरण सुरेशकांबळे, ऍड.शिवाजीराव कराड, महादेव इटके आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सनतकुमार बनवसकर यांचे तसेच आर.बी.आय., सहकार खात्याचे आयुक्त, तथा निबंधक, उपनिबंधक, सहायक निबंधक तसेच बँकेचे सहाय्यक सरव्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी, आय.टी.अधिकारी, सर्व शाखाधिकारी, कर्मचारी, पिग्मी एजंट यांचेसह सभासद, ठेवीदार, खातेदार, कर्जदार, हितचिंतक आदींचे सातत्यपूर्ण सहकार्य लाभत असल्याची माहिती देवून अध्यक्ष ऍड.मकरंद पत्की यांनी सभासदांच्या अपेक्षा, बँकींग सेवा योग्य व पारदर्शक रहाव्यात यासाठी बँकेचे संचालक मंडळ व अधिकारी, कर्मचारी वर्ग हा प्रयत्न करीत आहे. आलेल्या सुचनांचे स्वागत करून, सुचनांची योग्य ती दखल घेऊन त्यांना सकारात्मक प्रतिसाद देतो. यामुळे बॅंकिंग सेवा ही अधिक गुणवत्तापूर्ण होईल असा विश्‍वास अध्यक्ष ऍड.पत्की यांनी व्यक्त केला. दीनदयाळ बँकेच्या २८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस बँकेचे सभासद, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. सभेचे सुत्रसंचालन ओंकार कुलकर्णी यांनी केले. तर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करून उपस्थितांचे आभार बँकेचे उपाध्यक्ष ऍड.राजेश्वर देशमुख यांनी मानले. शांती मंत्राचे पठण करून वार्षिक सर्वसाधारण सभेची सांगता करण्यात आली. सभेच्या यशस्वितेसाठी बँकेच्या वतीने पुढाकार घेण्यात आला.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.